साईडपट्टीच्या खड्ड्यात ट्रॅक्टर पलटी; युवकाचा मृत्यू एक गंभीर जखमी; अपूर्ण रस्त्यावरील सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर; ठेकेदारावर कारवाईची मागणी

साईडपट्टीच्या खड्ड्यात ट्रॅक्टर पलटी; युवकाचा मृत्यू एक गंभीर जखमी; अपूर्ण रस्त्यावरील सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर; ठेकेदारावर कारवाईची मागणी
Published on: 
13456, 13457 फोटो- मृत पंकज ठाकरे कोल्हेर-अहिवंतवाडी-पिंप्री अंचला रस्त्यावर उलटलेला ट्रॅक्टर. कोल्हेर शिवारात अपघात; एक ठार, एक जखमी सकाळ वृत्तसेवा वणी, ता. ६ : पिंप्री अंचला-अहिवंतवाडी मार्गावरील कोल्हेर शिवारात शुक्रवारी (ता. ६) सकाळी रस्त्याच्या कडेला खोदलेल्या खोल खड्ड्यात ट्रॅक्टर उलटून झालेल्या अपघातात पंकज प्रकाश ठाकरे (वय १७, रा. अहिवंतवाडी) याचा मृत्यू झाला, तर ओंकार अशोक भुसार (१८) गंभीर जखमी झाला. ऐन दिवाळीत घडलेल्या या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. अहिवंतवाडी येथील पंकज ठाकरे आणि ओंकार भुसार शुक्रवारी पहाटे नीलेश संजय ठाकरे (१८) याच्यासमवेत ट्रॅक्टर-ट्रॉलीत टोमॅटोचे क्रेट भरून खोरीफाटा येथील बाजारपेठेत विक्रीसाठी जात होते. सकाळी साडेपाच ते सहाच्या सुमारास त्यांचा ट्रॅक्टर कोल्हेर शिवारात आला. येथे दोनपदरी रस्त्याचे काम सुरू असून, रस्त्याच्या कडेला साइडपट्टीचे काम अपूर्ण असून, खोलगट भाग आणि खड्डे कायम आहेत. पहाटे अंधूक प्रकाशात ट्रॅक्टरचे चाक रस्त्याच्या कडेला खड्ड्यात गेल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून ट्रॅक्टर उलटला. या अपघातात पंकज ठाकरे ट्रॅक्टरखाली पूर्णपणे दबला गोला, तर ओंकार भुसार गंभीर जखमी झाला. अपघातानंतर ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत दोघांना बाहेर काढले आणि वणी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान पंकजचा मृत्यू झाला. ओंकारची प्रकृती गंभीर असल्याने त्याला नाशिकला हलविण्यात आले. .....