Nashik Water Pipeline : पंचवटीत खासगी कंपनीचा आडमुठेपणा! मुख्य पाईपलाईन फोडली, होळीच्या सणाला नागरिकांचे हाल

20-Inch Main Water Pipeline Bursts During Fiber Cable Work : खासगी दूरध्वनी कंपनीकडून फायबरची भूमिगत केबल मोटरद्वारे टाकण्याचे काम सुरू असताना दत्तमंदिराजवळ पाणीपुरवठा करणारी २० इंची मुख्य पाइपलाइन रविवारी फुटली.
Water Pipeline

Water Pipeline

sakal

Updated on

पंचवटी: कोणार्कनगर परिसरात खासगी दूरध्वनी कंपनीकडून फायबरची भूमिगत केबल मोटरद्वारे टाकण्याचे काम सुरू असताना दत्तमंदिराजवळ पाणीपुरवठा करणारी २० इंची मुख्य पाइपलाइन रविवारी (ता. १) फुटली. परिणामी गणेश मार्केटच्या मागील परिसरातील नागरिकांना ऐन होळी व धूलिवंदनाच्या दिवशी पाण्याविना राहावे लागले. संतप्त नागरिक आणि लोकप्रतिनिधींनी पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना घटनास्थळी बोलावून जाब विचारला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com