esakal | पर्यटनासाठी कोकण, गोव्याला अधिक पसंती! हिवाळी पर्यटनाला नाशिककर पडले बाहेर 
sakal

बोलून बातमी शोधा

goa.jpg

हिवाळ्यात लॉकडाउन पूर्णपणे संपून पर्यटन व्यवसाय पुन्हा उभारी घेईल असे वाटत होते; परंतु कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता व युरोपात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने अजूनही आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू न झाल्याने पर्यटन व्यवसाय अद्यापही सावरत नाही; परंतु गेल्या सात महिन्यांपासून घरात बसून कंटाळलेल्या नाशिककरांनी जवळच्या अंतरावर का होईना टूर करण्याचा निर्णय घेताना कोकण व गोव्याला पसंती दिली आहे.

पर्यटनासाठी कोकण, गोव्याला अधिक पसंती! हिवाळी पर्यटनाला नाशिककर पडले बाहेर 

sakal_logo
By
विक्रांत मते

नाशिक : कोरोना लॉकडाउनला त्रस्त नाशिककरांनी कोकण, गोवा भागात पर्यटनाला पसंती दिली आहे. मुंबईतून रो-रो सेवा सुरू झाल्याने नाशिककरांनी त्याचा लाभ घेत अलिबागच्या समुद्रकिनाऱ्यावर मुक्काम ठोकला आहे. एक दिवसाचे पर्यटन म्हणून केळवा, डहाणू बीचवर नाशिककरांची गर्दी वाढली आहे. धार्मिक पर्यटनात त्र्यंबकेश्‍वरला पसंती मिळत आहे. 

पर्यटनासाठी कोकण, गोव्याला अधिक पसंती 
पर्यटनासाठी हिवाळा ऋतू सर्वाधिक पोषक असतो. याच काळात देशाबाहेर व देशांतर्गत पर्यटन मोठ्या प्रमाणात वाढते परंतु यंदा कोरोनामुळे पर्यटनावर मर्यादा आली. मार्चमध्ये लॉकडाउन जाहीर झाल्यानंतर उन्हाळी पर्यटनात झालेले बुकिंग रद्द करण्याची वेळ टुरिस्ट कंपन्यांवर आली. सात महिन्यांनंतर परिस्थिती पूर्वपदावर येत असली तरी पर्यटन व्यवसाय मात्र यातून अद्यापही सावरला नाही. हिवाळ्यात लॉकडाउन पूर्णपणे संपून पर्यटन व्यवसाय पुन्हा उभारी घेईल असे वाटत होते; परंतु कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता व युरोपात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने अजूनही आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू न झाल्याने पर्यटन व्यवसाय अद्यापही सावरत नाही; परंतु गेल्या सात महिन्यांपासून घरात बसून कंटाळलेल्या नाशिककरांनी जवळच्या अंतरावर का होईना टूर करण्याचा निर्णय घेताना कोकण व गोव्याला पसंती दिली आहे.

हेही वाचा > मामाने वाचवले पण नियतीने हिरावले! चिमुकल्या जयाची मृत्युशी झुंज अपयशी

हिवाळी पर्यटनाला नाशिककर पडले बाहेर 

आंतरराष्ट्रीय टूर बंद असल्याने स्थानिक भागातील पर्यटनाला पसंती मिळताना दिसत आहे. एरवी या सीझनमध्ये केरळ, अंदमान, गोवा या भागाला पसंती मिळते परंतु यंदा नाशिककरांची सर्वाधिक पसंती कोकणला मिळाली आहे. मुंबईहून रो-रो सेवा सुरू झाल्याने वाहनासहित प्रवास होत असल्याने अवघ्या चार तासांत अलिबागच्या समुद्रकिनाऱ्यावर वाहनासह पोचता येत असल्याने नाशिककरांची या सेवेला पसंती मिळत आहे. 

हेही वाचा > मोकाट कुत्र्याच्या तावडीत इवलेसे बिथरलेले पाडस; युवकांनी दिले जीवदान


दिवाळीपूर्वी शासनाने मंदिरे खुली करण्याची परवानगी दिली असती तर धार्मिक पर्यटन वाढले असते. आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद आहे तर देशांतर्गत पर्यटनाला कोरोनामुळे मर्यादा आल्याने कोकण व समुद्रकिनारी पर्यटन वाढले आहे. -दत्ता भालेराव, माजी अध्यक्ष, ट्रॅव्हल्स असोसिएशन, नाशिक 
 

loading image