YEO26B27203
कोटमगाव : येथील यात्रेत भाविकांची चरण सेवा करताना प्रभाकर झळके व सहकारी.
----------------
३०-२
पादत्राणे सांभाळण्याच्या
सेवेचे यंदा ४० वे वर्ष!
----------
कोटमगाव यात्रेत झळकेंचा सेवायज्ञ
----------
सकाळ वृत्तसेवा
येवला, ता.१७ : देवाच्या दर्शनासाठी येणाऱ्या हजारो भाविकांच्या पादत्राणांची काळजी घेताना स्वतःच्या सेवेतच समाधान शोधणारे हात म्हणजे प्रभाकर झळके आणि त्यांचे सहकारी. कोटमगावच्या श्री जगदंबामाता यात्रेत चार दशकांपासून सुरू असलेली ‘मोफत चरणसेवा’ ही केवळ पादत्राणे सांभाळण्याची व्यवस्था नसून, निःस्वार्थ सेवाभावाची आणि माणुसकीची जपलेली परंपरा आहे. प्रसिद्ध व्यंगचित्रकार प्रभाकर झळके यांनी सुरू केलेल्या या उपक्रमातून भक्तीला सेवेची जोड देत सामाजिक बांधिलकीचा अनोखा आदर्श निर्माण केला आहे.
भाविकांची पादत्राणे जपून ठेवण्याची साधी वाटणारी, पण तितकीच महत्त्वाची सेवा चार दशकांपासून अविरतपणे सुरू ठेवत प्रसिद्ध व्यंगचित्रकार प्रभाकर झळके यांनी सेवाभावाचा अनोखा आदर्श निर्माण केला आहे. १९८३ पासून धडपड मंचच्या माध्यमातून मोफत चरणसेवेचा उपक्रम सुरू केला. कोणताही आर्थिक मोबदला न घेता सेवा देणे, हे या उपक्रमाचे वैशिष्ट्य़ आहे. या उपक्रमात वैभव भांडगे, श्रावण शेलार, मयूर पारवे, मुकेश लचके, दत्ता कोटमे, रोहित लोंढे, परेश वडे, संतोष खंदारे, पंकज सांबर, गोपी दाणी, वरद लचके आदी सहकारी योगदान देतात.
----------------