पान-३ फोटो वापरणे
---------------
कोटमगावच्या यात्रेत प्रथमच कृषी प्रदर्शन
-----------
जगदंबा माता नवरात्रोत्सव ः शेतकऱ्यांसाठी नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती उपलब्ध करणार
-------------
सकाळ वृत्तसेवा
येवला, ता. ३ : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कोटमगाव येथील जगदंबा माता यात्रेनिमित्त यंदाच्या नवरात्रोत्सवात प्रथमच जगदंबा देवस्थान ट्रस्टतर्फे प्रथमच कृषी प्रदर्शन भरविण्यात येणार आहे.
-----------
कोटमगाव येथे नवरात्रोत्सवानिमित्त दरवर्षी मोठी यात्रा भरते. नवरात्रोत्सवात राज्याच्या विविध भागांतून लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात. धार्मिक श्रद्धेचे केंद्र असलेल्या कोटमगावच्या नवरात्रोत्सवाला यंदा कृषी प्रदर्शनाची जोड मिळणार आहे. त्यामुळे धार्मिकतेसोबतच आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरली जाणार आहे. शेतकऱ्यांना शेतीतील आधुनिक बदल, नवनवीन तंत्रज्ञान आणि शेतीच्या प्रगत पद्धतींची माहिती एकाच ठिकाणी मिळणार आहे.
तालुका हा शेतीप्रधान तालुका आहे. बदलते हवामान, पाण्याची कमतरता, वाढता उत्पादन खर्च आणि शेतीमालाच्या बाजारभावातील चढउतार यामुळे शेतकऱ्यांसमोर अनेक आव्हाने आहेत. या पार्श्वभूमीवर आधुनिक शेती तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने हे प्रदर्शन आयोजित करण्यात येत आहे.
------------
१६-१ चौकट
काय असेल प्रदर्शनात
प्रदर्शनामध्ये आधुनिक कृषी यंत्रसामग्री, सुधारित बियाणे, सिंचनाच्या आधुनिक पद्धती, कृषी निविष्ठा, पीक व्यवस्थापन, शेतीपूरक व्यवसाय तसेच शेतीतील नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती उपलब्ध करून देण्यात येणार आहे. कृषी क्षेत्रातील तज्ज्ञ, विविध संस्था आणि संबंधित क्षेत्रातील प्रतिनिधींचा सहभाग राहणार असल्याचे ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
------------
नवरात्रोत्सवात लाखो भाविकांची गर्दी होत असल्याने दर्शन व्यवस्था, वाहतूक, पार्किंग, पिण्याचे पाणी, स्वच्छता, आरोग्य आणि सुरक्षाव्यवस्थेचेही नियोजन करण्यात येत आहे.ट्रस्टचे अध्यक्ष रावसाहेब कोटमे, उपाध्यक्ष भाऊसाहेब आदमाने, दिलीप कोटमे, अंबादास भोसले, अंबादास लहरे, गणेश कोटमे, डॉ. शंकर कोटमे, लहानू धांद्रे, शुभदा दाणी,शैला कलंत्री, सुमनबाई कोटमे, व्यवस्थापक राजेंद्र कोटमे आदी यात्रेचे नियोजन करत आहे.
-------------