Nashik Crime News : अंबडला गावठी कट्टा, पंचवटीत कोयत्या बाळगणाऱ्यास अटक

Criminal arrested
Criminal arrestedesakal

नाशिक : अंबडमधील चुंचाळे शिवारात एकाकडून गावठी कट्ट्यासह दोन जिवंत काडतुसे तर, पंचवटीतील मानेनगर परिसरामध्ये कोयता बाळगणार्यास शहर पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी संबंधित पोलीसात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. (Koyta holder arrested in Ambad Gavthi Katta holder arrested in Panchavati Nashik Crime News)

खंडणी विरोधी पथकाला, अंबडच्या चुंचाळे शिवारातील दातीरनगरमध्ये एका संशयिताकडे गावठी कट्टा असल्याची माहिती मिळाली होती. पथकाने रविवारी (ता. ९) साडेसहा वाजेच्या सुमारास केदारनाथ ट्रान्सपोर्ट जवळ संशयित मयुर रामदास गांगुर्डे (२८, रा. सुयोग अपार्टमेंट, दातीरनगर) यास ताब्यात घेतले.

त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडून एक गावठी कट्टा व दोन जिवंत काडतुसे असा ३१ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी अंबड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई खंडणी विरोधी पथकाने केली.

तर, पंचवटीतील मानेनगर परिसरात कोयताधारी फिरत असल्याची खबर गुंडाविरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने सोमवारी (ता. १०) सकाळी दहाच्या सुमारास सापळा रचून रासबिहारी रोडवरील एस.बी. ट्रेडर्स या भंगार दुकानाच्या परिसरातून अटक केली.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

Criminal arrested
Jalgaon Crime News : भुसावळमधून पानमसाल्यासह हुक्का पॉर्लरचे साहित्य जप्त

नदीम रफिक शेख (३२, रा. रा. हरि मंजिल, द्वारका) असे संशयिताचे नाव आहे. संशयित शेख याच्याकडून एक कोयता जप्त करण्यात आला असून, पंचवटी पोलीसात शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कारवाई पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, उपायुक्त प्रशांत बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे सहायक निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, मलंग गुंजाळ, दादाजी पवार, राजेश सावकार, सुनिल आडके, कैलास चव्हाण, प्रदीप ठाकरे, दिनेश धकाते, संदीप आंबरे, बाळासाहेब सोनकांबळे, सचिन पाटील यांनी बजावली

Criminal arrested
Pune Crime: पुणे पोलिसांची दमदार कामगिरी! विमानाचे इंधन चोरणारी टोळी गजाआड

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com