दोन कॉलम
--
विभागीय क्रीडा स्पर्धेत
हजार विद्यार्थ्यांचा सहभाग
(उपशीर्षक)
निवड चाचणी स्पर्धेला सुरवात
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. १८ : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक अंतर्गत ''विभागीय निवड चाचणी क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. जळगावच्या शासकीय होमिओपॅथी महाविद्यालय व रुग्णालय यांच्या वतीने आयोजित स्पर्धेला छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलात आजपासून सुरवात झाली असून १९ नोव्हेंबरपर्यंत स्पर्धा होईल.
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. व्यंकट गीते आणि कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. आज (ता.१८) नगरसेवक विशाल भोळे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून उद्घाटन झाले. याप्रसंगी नाशिकचे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ उपकुलसचिव डॉ. प्रमोद पाटील, जीएमसीचे अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर अधिष्ठाता, जिल्हा क्रीडा अधिकारी डॉ. दिलीप दिघे, सॉफ्टबॉल असोसिएशनचे राज्य सचिव डॉ. प्रदीप तळवलकर, ॲथलेटिक्स असोसिएशनचे सहसचिव राजेश जाधव, कबड्डी असोसिएशन सहसचिव नितीन बरडे आदी उपस्थित होते.
शासकीय होमिओपॅथी महाविद्यालय व रुग्णालयाचे सत्र अधिष्ठाता डॉ. पराग भागवत, अधिष्ठाता डॉ. संतोष चव्हाण, उपकुलसचिव महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ डॉ प्रमोद पाटील आणि मुख्य समन्वयक डॉ. अर्चना काबरा यांच्या प्रमुख उपस्थितीत स्पर्धेचे नियोजन केले आहे.
एक हजार विद्यार्थी सहभागी
विभागीय निवड चाचणी क्रीडा स्पर्धेत कबड्डी, खो- खो, बास्केटबॉल, व्हॉलीबॉल आणि ऍथलेटिक्स यासारख्या विविध खेळांचा समावेश आहे. या क्रीडा स्पर्धेत जिल्ह्यातील विविध शासकीय होमिओपॅथिक आणि आयुर्वेदिक, डेंटल, नर्सिंग फिजियोथेरपी, युनानी महाविद्यालयांमधील एक हजार विद्यार्थी सहभागी झाले आहेत.