टुडे पान ३ संक्षिप्त पट्टा

टुडे पान ३ संक्षिप्त पट्टा
Published on: 
टुडे पान ३ संक्षिप्त पट्टा सात वर्षीय कृष्णाचा स्केटिंगमध्ये विश्वविक्रम जळगाव : जामनेर येथील लॉर्ड गणेशा इंग्लिश मीडियम स्कूलचा दुसरीतील विद्यार्थी कृष्णा सागर गोसावी याने वयाच्या अवघ्या सातव्या वर्षी स्केटिंगमध्ये विश्वविक्रम नोंदवून जिल्ह्याचा लौकिक वाढवला आहे. कर्नाटकातील बेळगाव येथे ''एच्युव बाय शिवगंगा आरएसी इंडिया'' संस्थेने आयोजित केलेल्या ७२ तासांच्या विशेष उपक्रमात कृष्णाने ही नेत्रदीपक कामगिरी बजावली. त्याने इनलाइन स्केट्सवर उलट्या दिशेने (रिव्हर्स) धावत १०० मीटरचे अंतर केवळ १७.९३ सेकंदांत पार केले. त्याच्या या अनोख्या कौशल्याची जागतिक विक्रम म्हणून अधिकृत नोंद करण्यात आली आहे. या ऐतिहासिक यशामागे प्रशिक्षक आनंद मोरे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले असून, कृष्णाच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे. --- धम्म ग्रंथ वाचनाचा आज होणार समारोप जळगाव : शिवाजीनगर येथील महामाया बुद्ध विहारात पवित्र वर्षावासाच्या कालावधीत गेल्या ३ महिन्यांपासून सुरू असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित बुद्ध आणि त्यांचा धम्म या महान ग्रंथाच्या नियमित पठणाचा भव्य सांगता सोहळा रविवारी (ता. १५) सकाळी १० वाजता करण्यात येत आहे. दररोज सायंकाळी १ ते २ तास नियमितपणे सरासरी ६ ते ८ पानांचे वाचन व त्यावरील चिंतन करत या संपूर्ण ग्रंथाचे पठण करण्यात आले. रविवारी सकाळी नऊला छत्रपती शिवाजी महाराज स्मारक ते महामाया बुद्ध विहार भव्य धम्म रॅली काढण्यात येईल. सकाळी १० वाजता बुद्धपूजा व त्रिरत्न वंदना होईल. सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत भिक्खू धम्मबोधी थेरो व भिक्खू बोधिधम्मा थेरो यांच्या प्रमुख उपस्थितीत भोजनदान, धम्मदेशना, चिवरदान व उपासकांचे भोजनदान होईल. सोहळ्यास धम्मबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन महामाया बुद्ध विहार समिती व उपासक-उपासिकांनी केले आहे. --- बाजरी दरात काहीशी सुधारणा जळगाव : खानदेशात बाजरीची आवक बाजारात कमी आहे. दर सरासरी ३८०० रुपये प्रतिक्विंटलवर स्थिर आहे. बाजरीची कापणी, मळणी अजून खरिपातील हंगामाबाबत आटोपली. उत्पादन कमी आहे. काही भागात सिंचन केल्याने बाजरीचे पीक हाती येवू शकले आहे. आवक बाजारात कमी आहे. सध्या किमान २८०० व कमाल ४२०० रुपये प्रतिक्विंटलचा दर विविध बाजार समित्यांत मिळत आहे. बाजरीसाठी खानदेशात जळगावमधील अमळनेर, चोपडा, चाळीसगाव, धुळ्यातील धुळे, साक्री, शिरपूर, दोंडाईचा (ता.शिंदखेडा) आणि नंदुरबारमधील नंदुरबार व शहादा या बाजार समित्या प्रसिद्ध आहेत. दरात काहीशी सुधारणा दिसत आहे. काही शेतकरी मध्य प्रदेशातील इंदूर व बडवानीदेखील बाजरीची विक्री करतात. ---- शिरसोली गोशाळेत गोवर्धन पूजा उत्साहात जळगाव : शिरसोली येथील जय गोमाता दक्षेश्वर महादेव मंदिर गोशाळेत पारंपरिक उत्साहात गोवर्धन पूजा साजरी करण्यात आली. नुकत्याच ५ नोव्हेंबरला या गोशाळेत लागलेल्या भीषण आगीत मोठ्या प्रमाणात चारा जळून खाक झाला होता, ज्यामुळे मोठे आर्थिक नुकसान झाले होते. या घटनेची तत्काळ दखल घेत राज्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी संवेदनशीलता दाखवत गोशाळेला ५१ हजार रुपयांची आर्थिक मदत सुपूर्द केली. या विशेष प्रसंगी यशवंत बारी, श्याम कोगटा आणि माजी सरपंच नंदलाल पाटील यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. ---- रखडलेली केळी काढणीस गती जळगाव : खानदेशात केळीची आवक कमी होत आहे. दुसरीकडे सणासुदीनिमित्त रखडलेली काढणी पुन्हा गती घेत आहे. केळी खरेदीला किंवा केळीच्या शिवार खरेदी, सौद्यांना चांगली सुरवात या आठवड्यात झाली आहे. पण केळीची कमी दरातील खरेदी सुरूच आहे. केळीला किमान ५०० व कमाल १४०० ते १६०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळत आहे. केळीची आवक खानदेशात सध्या प्रतिदिन सरासरी ५५ ते ६० ट्रक (एक ट्रक १६ टन क्षमता) एवढी आहे. आवक जळगाव, जामनेर, चोपडा, यावल, पाचोरा, भडगाव या भागात अधिक आहे. रावेर, मुक्ताईनगरात आवक कमी झाली आहे. चोपडा, जळगाव, जामनेर आदी भागात दर्जेदार केळी उपलब्ध आहे. यामुळे केळीला या भागात चांगल्या दरांची शेतकऱ्यांना अपेक्षा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.