नाशिक- राज्याचे कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांचे धाकटे बंधू भारत कोकाटे हे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला ‘जय महाराष्ट्र’ करण्याच्या विचारात असून, लवकरच त्यांचा शिवसेनेत प्रवेश होणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वेळ मिळताच हा सोहळा पार पडेल.