Degree Course Admission: केटीएचएम महाविद्यालयात प्रवेश अर्जाची या तारखेपर्यंत मुदत! येथे भरा मेरीट फॉर्म

पदवी अभ्यासक्रमांच्‍या प्रवेशाच्‍या प्रक्रियेला सुरवात
Degree course
Degree course Sakal

Degree Course Admission : मविप्र संस्‍थेच्‍या गंगापूर रोडवरील केटीएचएम महाविद्यालयात पदवी अभ्यासक्रमांच्‍या प्रथम वर्षास प्रवेशाच्‍या प्रक्रियेला सुरवात केली आहे.

बारावीचा निकाल जाहीर झाल्‍यानंतर हे वेळापत्रक जाहीर केले असून, इच्‍छुक विद्यार्थ्यांना ३ जूनपर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. (KTHM college degree courses admission application deadline till 3rd junde nashik news)

शैक्षणिक वर्ष २०२३-२४ करिता ही प्रक्रिया राबविली जाते आहे. महाविद्यालयात प्रथम वर्ष पदवी वर्गांचे प्रवेश ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेव्दारे होणार आहेत. त्‍यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी http://www.kthmcollege.ac.in किंवा https://mvperp.org या संकेतस्थळाला भेट देऊन 'मेरीट फॉर्म' भरावयाचा आहे.

अर्ज करण्याची मुदत शुक्रवार (ता.२६) पासून ३ जूनपर्यंत असेल. मेरिट फॉर्म भरल्यानंतर विद्यार्थ्यांनी मेरिट फॉर्मची प्रिंट काढून जपून ठेवावी. त्यानंतर गुणवत्ता यादीसाठी महाविद्यालयाचे संकेतस्थस्थळास भेट देऊन आपला मेरीट फॉर्म भरावयाचा आहे.

प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी तत्काळ प्रथम वर्ष वर्षाकरिता प्रवेशासाठी आपला मेरीट फॉर्म भरावा, असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. डी. दरेकर यांनी केले आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Degree course
HSC Success Story : उसनवारीच्या पुस्तकातून यशाला गवसणी!

उपलब्‍ध अभ्यासक्रम (कंसात प्रवेश क्षमता)

एफवायबीए (८४०), एफवायबी.कॉम. (९६०), एफ.वाय बी.एस्सी (४८०), बी.एस्सी-बायोटेक्‍नॉलॉजी (४५), बी.एस्सी-कॉम्‍प्‍युटर सायन्‍स (१६०), एफवाय-बीसीए (८०), एफवाय-बीबीए (८०), एफवाय बी.एस्सी- सायबर ॲण्ड डिजिटल सायन्‍स (८०), बी.एस्सी-ॲनिमेशन (३०), बी.एस्सी-ब्‍लेंडेड सायन्‍स (६४),

बी.व्‍होक : इंटेरियर डिझाईन, प्रिंटिंग टेक्‍नॉलॉजी, मास मीडिया, डायरेक्‍ट ॲण्ड इनडायरेक्‍ट टॅक्‍स, ड्रॅमेटिक्‍स (प्रत्‍येक विषयनिहाय पन्नास जागा) या अभ्यासक्रमांना प्रवेशाची संधी उपलब्ध असेल.

Degree course
Farmer Agitation: शेतकऱ्यांचे प्रतिनिधी मंडळ CMच्या भेटीसाठी रवाना; शेतकऱ्यांचे समृद्धी वरील आंदोलन स्थगित

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com