फोटो : H34203
नाशिक : विभागीय शालेय स्पर्धेत यशस्वी खेळाडूंचा सत्कार करताना प्राचार्या डॉ कल्पना अहिरे. समवेत प्राध्यापक वृंद.
--
क्रिकेट स्पर्धेत केटीएचएमच्या
मुलींचा संघ विभागीय विजेता
रत्नागिरीतील राज्यस्तरीय स्पर्धेत होणार सहभागी
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. १ : जळगाव येथे झालेल्या विभागीयस्तरावरील १९ वर्षाआतील मुलींच्या क्रिकेट स्पर्धेत केटीएचएम महाविद्यालयाच्या मुलींच्या संघाने प्रथम क्रमांक प्राप्त केला. या कामगिरीच्या आधारे संघाची निवड राज्यस्तरीय स्पर्धेसाठी झाली असून, रत्नागिरी येथे होणाऱ्या स्पर्धेत संघ सहभागी होईल.
केटीएचएम महाविद्यालयचा उपांत्यफेरीचा सामना जळगाव ग्रामीण संघासोबत झाला. या सामन्यात केटीएचएमने निर्विवाद वर्चस्व राखून विजय मिळवला. अंतिम सामना नंदुरबार संघासोबत झाला. या सामन्यात केटीएचएमने यश मिळविले. विजयी संघात सिद्धी पिंगळे ( कर्णधार), कार्तिकी गायकवाड, धनश्री काकड, मधुरा दायमा, श्रद्धा इंगोले, जान्हवी जाधव, अन्विशा सपकाळे, निधी वनवारी, श्रावणी काळे, गौरी अहिरे, अनुष्का सोनवणे, ज्ञानेश्वरी घोलप, कावेरी सावंत, आर्या गुजराथी, दीपश्री गव्हाणे, भूमी जेऊघाले यांचा समावेश आहे. यशस्वी खेळाडूंचा सत्कार प्राचार्या. डॉ कल्पना अहिरे, उपप्राचार्य डॉ. के. एस. शिंदे, उपप्राचार्य डॉ. वसंत बोरस्ते, विभागप्रमुख किरण रेडगावकर आदींनी केला. खेळाडूंना क्रीडाशिक्षक प्रा. हेमंत पाटील, प्रा. अविनाश कदम, प्रा. गणपत आहेर, प्रा. सागर कडलग, प्रा. उद्धव डेर्ले यांचे मार्गदर्शन लाभले.