केटीएचएममध्ये आंतरविभागीय मुलींच्या हँडबॉल स्पर्धा

केटीएचएममध्ये आंतरविभागीय मुलींच्या हँडबॉल स्पर्धा
Published on: 
केटीएचएममध्ये आजपासून आंतरविभागीय हँडबॉल स्पर्धा सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. २५ : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठांतर्गत आंतरविभागीय मुलींच्या हँडबॉल स्पर्धेचे आयोजन केटीएचएम महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर केले आहे. सोमवार (ता. २६) व मंगळवारी (ता. २७) असे दोन दिवस होत असलेल्‍या स्‍पर्धेत पुणे, अहिल्‍यानगरसह नाशिक जिल्ह्यातील संघ सहभागी होतील. या स्पर्धेतील कामगिरीच्या आधारे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संघाची निवड केली जाईल. तब्बल १६ वर्षांनंतर केटीएचएम महाविद्यालयात हॅण्डबॉल स्पर्धा पार पडत आहे. स्पर्धेच्या आयोजनासाठी महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर दोन हँडबॉल मैदाने तयार केले असून, स्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. या स्पर्धेच्‍या उद्‌घाटनासाठी मविप्रचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे उपस्थित राहतील. तसेच प्रशासकीय सेवेतील अधिकारी आणि राष्ट्रीय हँडबॉल खेळाडू कविता पाटील, निवृत्त जिल्‍हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक, जिल्हा क्रीडा समिती सचिव डॉ. चेतन आव्हाड, सहसचिव डॉ. राजाराम कारे, डॉ. स्वप्निल कर्पे आदी उपस्‍थित राहातील. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. कल्पना आहिरे या स्पर्धा संयोजन समितीच्या अध्यक्ष आहेत. विद्यापीठ निरीक्षक म्हणून डॉ. रोशनी गुजराथी, प्रा. दिनेश कराड काम बघत आहेत. विविध विभागांतील संघांमध्ये चुरशीच्या लढती पहायला मिळतील. स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ संस्थेचे सभापती बाळासाहेब क्षीरसागर, शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त सुनील मोरे, लहानू जाधव यांच्‍या उपस्‍थितीत पार पडेल. स्पर्धा यशस्वितेसाठी क्रीडा संचालक तथा स्पर्धेचे संयोजक प्रा. हेमंत पाटील, प्रा. अविनाश कदम आदी परीश्रम घेत आहेत. स्पर्धेत पंच म्हणून गणेश कोंडे, पवन पगारे, महेंद्र गवळी, शशिकांत थेटे, आशिष थापा, सूरज कातड, रोहन पिंगळे, कांचन जाधव, चैताली बोडके बघतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com