विभागीय धनुर्विद्या स्पर्धेत केटीएचएमच्‍या खेळाडूंची बाजी

विभागीय धनुर्विद्या स्पर्धेत केटीएचएमच्‍या खेळाडूंची बाजी
Published on: 
फोटो : H33211 नाशिक : धनुर्विद्या स्पर्धेत यशस्वी खेळाडूंचा सत्कार करताना डॉ. कल्पना अहिरे, डॉ. वसंत बोरस्ते आदी. -- विभागीय धनुर्विद्या स्पर्धेत केटीएचएमच्‍या खेळाडूंची बाजी सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. २१ : अक्कलकुवा (जि. नंदुरबार) येथे झालेल्या विभागीय धनुर्विद्या स्पर्धेमध्ये केटीएचएम महाविद्यालयाच्या खेळाडूंनी नेत्रदीपक यश मिळवले. या कामगिरीच्‍या आधारे हे सर्व खेळाडू राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत. १७ वर्षाआतील मुलींमध्ये ज्ञानेश्वरी जाधवने द्वितीय, १९ वर्षाआतील मुलींमध्ये सेजल दशपुतेने द्वितीय, रेवा गवळीने तृतीय क्रमांक पटकावला. १९ वर्षाआतील मुलांमध्ये संग्राम घेगडमलने तृतीय क्रमांक मिळविला. आर्चरी रिकव्हर प्रकारात १९ वर्षाआतील मुलांमध्ये विनय जाधवने द्वितीय, १९ वर्षाआतील मुलींमध्ये संयमी मोरेने द्वितीय क्रमांक पटकावला. मविप्रचे सरचिटणीस अ‍ॅड. नितीन ठाकरे, सभापती बाळासाहेब क्षीरसागर, अध्यक्ष डॉ. सुनील ढिकले आदींनी यशस्‍वी खेळाडूंचे अभिनंदन केले आहे. खेळाडूंचा सत्‍कार प्राचार्या डॉ. कल्पना अहिरे, उपप्राचार्य डॉ. के. एस. शिंदे, डॉ. वसंत बोरस्ते, विभागप्रमुख प्रा. किरण रेडगावकर आदींच्‍या उपस्‍थितीत झाला. खेळाडूंना क्रीडा शिक्षक प्रा. हेमंत पाटील, अविनाश कदम, गणपत आहेर, सागर कडलग, उद्धव डेरले, मोहन कसबे यांचे मार्गदर्शन लाभले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com