नाशिक- सिंहस्थाच्या निमित्ताने शहरात मलवाहिकांचे जाळे निर्माण केले जाणार असून या महत्त्वाच्या प्रकल्पासाठी महापालिकेकडून हरित कर्जरोखे (ग्रीन बॉण्ड) उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु, सदरचा निर्णय घेतल्यानंतर आता हरित कर्जरोखे नव्हे नियमित (रेग्युलर) कर्जरोखे अशी व्याख्या करण्यात आली आहे. अर्थ विभागाच्या या निर्णयामागे काही ‘अर्थ'' तर नाही ना? असा सवाल उपस्थित केला जात असून प्रशासनाकडून मात्र शब्द बदलल्याने फरक पडत नसल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे.