Ramkal Path Nashik
sakal
नाशिक: त्रिखंडी योगाने परिपूर्ण असा सिंहस्थ कुंभमेळा २०२७ मध्ये शहरात होणार असून, त्यासाठी काळाराम मंदिर ते रामतीर्थ असा भव्य स्वरूपात रामकाल पथ उभारण्यात येत आहे. या पथाच्या निर्मितीसाठी सध्या परिसरातील अडथळे हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र, या प्रक्रियेत अनेक पौराणिक, धार्मिक आणि ऐतिहासिक स्थळे नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याने नाशिकच्या प्राचीनत्वालाच धक्का लागणार की काय, अशी तीव्र चिंता व्यक्त केली जात आहे.