नाशिक- सिंहस्थ कुंभमेळ्यापर्यंत रस्ते विकासाची महत्त्वाची कामे होण्यासाठी बांधकाम विभागाने पुन्हा नव्याने प्राधान्यक्रम निश्चित केला असून, विभागीय आयुक्त कार्यालयाकडे पाठविण्यात आला आहे. जवळपास दोन हजार कोटी रुपयांच्या रस्ते कामांमध्ये १९५ किलोमीटरच्या रस्त्यांचे अस्तरीकरण, डांबरीकरण केले जाणार आहे. यामध्ये बाह्य, अंतर्गत बाह्यवळण रस्त्यांचा समावेश आहे.