Nashik Kumbh Mela
sakal
नाशिक: सिंहस्थ-कुंभमेळ्यातील अमृतस्नान पर्वण्या ऐन पावसाळ्यात आहेत. त्यामुळे भाविकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य असून, त्यादृष्टीने आराखडा तयार करण्यात येत आहे. त्यामध्ये आधुनिक तंत्रज्ञान व प्रणालीच्या सहाय्याने पावसाचे प्रमाण, धरणांतील उपलब्ध साठा तसेच गोदावरीच्या संभाव्य पूरस्थितीत करायच्या उपाययोजनांवर काम सुरू असल्याची असल्याची माहिती कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह यांनी दिली. यंदाच्या वर्षी पावसाळा संपताच साधुग्रामच्या कामाला प्रारंभ करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.