ध्वजारोहणाने सिंहस्थ कुंभमेळ्याचा आज बिगूल

ध्वजारोहणाने सिंहस्थ कुंभमेळ्याचा आज बिगूल
Published on: 
सर्व आवृत्तींसाठी --------ध्वजारोहण मुख्य बातमी-- पान १ मेन ---------------- ध्वजारोहणाने सिंहस्थ कुंभमेळ्याचा आज बिगूल - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची प्रमुख उपस्थिती - नाशिक, त्र्यंबकेश्वरला १२.०२ ला ध्वजपूजन, ध्वजारोहणाने मंगलपर्वाचा होणार प्रारंभ सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता.३० : नाशिक- त्र्यंबकेश्‍वर सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या मंगल पर्वाचा शनिवारी (ता.३१) प्रारंभ होत असून रामतीर्थ येथे दुपारी १२.०२ मिनिटांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार, तिन्ही वैष्णव आखाड्यांचे साधू-महंत, गंगा गंगा गोदावरी पुरोहित संघाचे सिंहस्थ समिती अध्यक्ष सतीश शुक्ल, चंद्रशेखर पंचाक्षरी यांच्या प्रमुख उपस्थितीत मुख्य ध्वजारोहण पार पडणार आहे. त्र्यंबकेश्‍वर येथे १२.०२ मिनिटांनी मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस व अमृता फडणवीस, शृंगेरी मठाचे शंकराचार्य विधुशेखर भारती यांच्या हस्ते ध्वजपूजन व ध्वजारोहण होईल. कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्यासह १० शैव आखाड्यांचे साधू महंत, अखिल भारतीय पुरोहित संघाचे अध्यक्ष मनोज थेटे यांच्या उपस्थितीत दुपारी दोनला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते १२ मिनिटांची गोदाआरती व त्यानंतर १५ मिनिटे त्र्यंबकेश्‍वर मंदिरात पूजाविधी होईल. आज, अश्विन कृष्ण षष्ठी, ३१ आॅक्टोबर सकाळी ८ ते दुपारी एकपर्यंत स्थापित देवता प्रातर्पूजन होईल. सकाळी ११ ते १२.३० दरम्यान राष्ट्रपती व प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत संकल्प, गणेश पूजन, पंचार्घ्य समर्पण व तीर्थ पूजन होणार आहे. मुख्य ध्वजारोहणानंतर गोदाआरती व प्रार्थना होईल. सायंकाळी ४.३० ते ७.३० दरम्यान प्रतिष्ठापना हवन, सायंपूजन व गोदाआरती होणार आहे. १६-१ महाआरतीत जनजातीय बांधव सिंहस्थ कुंभपर्वाच्या पार्श्वभूमीवर रामतीर्थ गोदावरी सेवा समितीतर्फे दुपारी रामतीर्थ येथे गोदापूजन व जनजातीय सिंहस्थ महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे. विश्‍वविक्रमाची महाआरती दुपारी तीनला होणार असून यावेळी ६५०० वनवासी बांधव सहभागी होणार आहेत. सायंकाळी सहाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या प्रमुख उपस्थितीत महागोदाआरती होणार आहे. मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन, मंत्रिमंडळातील मान्यवर सदस्य, तेरा आखाड्यांतील संत-महंत, जगद्गुरू, शंकराचार्य, विविध आध्यात्मिक परंपरांतील मान्यवर सहभागी होणार आहेत. जनजातीय बांधवांचा सन्मानपूर्ण सहभाग हे या आयोजनाचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य़ आहे. निसर्ग, जलस्रोत आणि पर्यावरणाशी असलेले त्यांचे अतूट नाते लक्षात घेऊन त्यांच्या सांस्कृतिक परंपरांचा गौरव करण्यात येणार आहे. याप्रसंगी काही सांस्कृतिक कार्यक्रमांचेदेखील आयोजन करण्यात आले आहे. --- चौकट महिला पुरोहित करणार पौरोहित्य या महाआरतीचे सर्वांत महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य़ म्हणजे विविध समाजघटकांतील महिला पुरोहित म्हणून गोदावरी मातेच्या पूजनविधीचे पौरोहित्य करणार आहेत. धार्मिक विधींचे निवेदन, पूजनविधीचे मार्गदर्शन आणि महाआरतीचे नेतृत्व अशा महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या महिला पार पाडणार आहेत. श्रद्धा, ज्ञान, साधना आणि सेवाभाव यांच्या माध्यमातून महिला धार्मिक व सांस्कृतिक परंपरांचे जतन आणि संवर्धन करण्यात मोलाचे योगदान देऊ शकतात, हा व्यापक संदेश या उपक्रमातून समाजापर्यंत पोहोचविण्यात येणार आहे. ---------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.