नाशिक: आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी महापालिकेने चार हजार कोटी रुपयांच्या रस्त्यांचा प्रस्ताव सादर केला; परंतु रस्त्यांचा प्राधान्यक्रम ठरविताना पोलिस विभागाला विचारात घेण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, त्या अनुषंगाने दोन हजार कोटींच्या रस्त्यांना कात्री लागली आहे. आता अति प्राधान्याची बाब म्हणून दोन हजार ६८ कोटींचे ५९ रस्ते निश्चित करण्यात आले आहेत. यात १८० किलोमीटरच्या रिंग रोडचा समावेश आहे.