नाशिक- सिंहस्थ कुंभमेळ्याचे नियोजन अधिक सुसूत्र आणि समन्वयपूर्ण व्हावे म्हणून प्राधिकरणासोबतच स्वतंत्र कुंभमेळा आयुक्त पदाची निर्मिती करण्यात आली आहे. नाशिक महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त करिश्मा नायर यांची या नव्याने तयार केलेल्या आयुक्त पदावर नियुक्ती झाली असून, त्यांच्याकडे या पदाचा अतिरिक्त कार्यभार राहणार आहे.