Girish Mahajan
sakal
नाशिक: नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्यासंदर्भातील विकासकामे करताना स्थानिक जनतेची गैरसोय होणार नाही, याची दक्षता यंत्रणांनी घ्यावी. सिंहस्थाचे उत्कृष्ट व प्रभावी नियोजन करून नाशिकचा देशभरामध्ये नावलौकिक वाढवावा, असे निर्देश जलसंपदा तथा कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांनी दिले. याप्रसंगी सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणातर्फे विविध यंत्रणांकडून सुरू असलेल्या विकासकामांचे सादरीकरण करण्यात आले.