Kumbh Mela Meeting
sakal
नाशिक: सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने कार्यान्वयीन यंत्रणांनी कामांच्या प्रशासकीय आणि तांत्रिक मान्यता प्राप्त केल्या आहेत, त्यांनी निविदा प्रक्रिया जलदगतीने पार पाडावी. तसेच इतर यंत्रणांनीही ही प्रक्रिया गतीने करून कामे वेळेत मार्गी लागतील यासाठी नियोजन करावे, अशा सूचना सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी दिल्या.