Kumbh Mela
sakal
नाशिक
Nashik Kumbh Mela : सिंहस्थात भाविकांची पायपीट थांबणार! गोदाघाटाजवळच उभारली जाणार अंतर्गत वाहनतळे
Traffic and Parking Blueprint for Kumbh Mela : सुरक्षितता व शहरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी शहराच्या सीमारेषांवरच बाह्य वाहनतळावर बाहेरील वाहने रोखली जातील. त्यामुळे भाविकांना घाटापर्यंत येण्यासाठी मोठी पायपीट करावी लागण्याची शक्यता होती.
नाशिक: आगामी कुंभमेळ्यासाठी कोट्यवधी भाविक येणार असून, सिंहस्थातील पर्वणीच्या शाहीस्नानाला अत्यंत महत्त्व असते. सुरक्षितता व शहरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी शहराच्या सीमारेषांवरच बाह्य वाहनतळावर बाहेरील वाहने रोखली जातील. त्यामुळे भाविकांना घाटापर्यंत येण्यासाठी मोठी पायपीट करावी लागण्याची शक्यता होती. ही पायपीट टाळण्यासाठी भाविकांना स्नानासाठीच्या गोदाघाटापर्यंत सहज पोहोचता यावे, यासाठी अंतर्गत वाहनतळाचे नियोजन केले आहे. त्यामुळे भाविकांची पायपीट टळेल.
