Kumbh Mela development planning
sakal
नाशिक रोड: मध्य प्रदेशातील उज्जैन येथे २०२८ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ-कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या कुंभनगरीचे नियोजन प्रत्यक्ष पाहण्यासाठी मध्य प्रदेश सरकारच्या नगरविकास विभागाचे अपर मुख्य सचिव संजय दुबे यांच्या नेतृत्वाखालील चार सदस्यीय शिष्टमंडळ बुधवारी (ता. १५) नाशिक येथे आले. या पथकाने विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांची भेट घेऊन नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ-कुंभमेळ्यासाठी सुरू असलेल्या विकासकामांची सविस्तर माहिती घेतली.