नाशिक- नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरण स्थापन करण्यास राज्य मंत्रिमंडळाने मंगळवारी (ता. ६) मान्यता दिली. प्रयागराजच्या धर्तीवर स्थापन करण्यात येणाऱ्या प्राधिकरणात ६५ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा समावेश करण्यात येणार आहे. त्यामुळे कुंभमेळ्याच्या विकासकामांना गती मिळेल.