नाशिक- सिहंस्थ कुंभमेळ्यानिमित्त नाशिकच्या सर्वांगीण विकासाची संधी चालून आली आहे. या माध्यमातून नाशिक-त्र्यंबकेश्वरला भाविकांसाठी कायमस्वरूपी सोयी-सुविधा निर्माण केल्या जातील, असे विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी सांगून आगामी कुंभमेळा यशस्वी करण्यासाठी स्थानिक लोकांनी पुढे येत प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.