ध्वजारोहणासाठीच्या पताका पुरोहित संघाकडे

ध्वजारोहणासाठीच्या पताका पुरोहित संघाकडे
Published on: 
नाशिक मुख्य अंक पान तीन ---------------------------- ध्वजारोहणासाठीच्या पताका पुरोहित संघाकडे रंग, आकार, प्रतीकांना विशेष महत्त्व सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. २७ : कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणासाठी वापरण्यात येणाऱ्या पताकांची व्यवस्था पुरोहित संघाकडे असून ध्वजारोहणाच्या मुख्य सोहळ्यासोबतच या पताकांचे धार्मिक स्वरूप आणि परंपरेविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. पताका म्हणजे केवळ उत्सवासाठी लावलेले ध्वज नव्हेत, तर धार्मिक परंपरा, मंगलसंकेत आणि पर्वाची ओळख दर्शविणारे प्रतीक मानले जाते. धार्मिक परंपरेत भगवा रंग त्याग, वैराग्य आणि साधनेशी जोडला जातो. धर्मध्वजावरील चिन्हे, त्याचा आकार आणि रंग यांनाही विशिष्ट संदर्भ असतात. मंदिरांची परंपरा, संप्रदाय आणि धार्मिक विधी यानुसार पताकांचे स्वरूप बदलते. ध्वजस्तंभ ही ध्वज उभारण्याची रचना, पताका हा धार्मिक ध्वज, तर बोधचिन्ह ही पर्वाची दृश्य ओळख आहे. ध्वजारोहणासाठी पताकांवर समुद्रमंथन तसेच अमृतकुंभाची कथा रेखण्यात आली आहे. या पताका सिंहस्थ सुरू झाल्याची नांदी ठरणार आहेत. --- पताका पताका म्हणजे ध्वजाच्या स्वरूपातील वस्त्र. तिचा रंग, आकार आणि त्यावरील धार्मिक चिन्हे यांना परंपरेनुसार महत्त्व असते. भगवा रंग त्याग, वैराग्य आणि साधनेचे प्रतीक मानला जातो. त्रिकोणी किंवा आयताकृती आकार, तसेच ॐ, त्रिशूळ यांसारखी चिन्हे विविध धार्मिक परंपरांमध्ये वापरली जातात. मात्र, प्रत्येक पताकेचा रंग आणि आकार वेगवेगळा असतो. --- धर्मध्वज धर्मध्वज हा एखाद्या देवतेचा, धार्मिक परंपरेचा किंवा संप्रदायाचा प्रतिनिधी ध्वज असतो. कुंभमेळ्यात विविध आखाड्यांच्या धर्मध्वजांना विशेष महत्त्व आहे. ते त्या आखाड्याची परंपरा, धार्मिक निष्ठा आणि स्वतंत्र ओळख दर्शवतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com