नाशिक: कुंभमेळ्यासाठी अद्याप शासनाकडून निधीची घोषणा न झाल्याने महापालिकेला स्व-निधी खर्च करावा लागत आहे. तर, दुसरीकडे निधी उपलब्ध होण्यासाठी कर्जरोखे काढण्याची तयारी सुरू झाली आहे. एका बाजूने निधी उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न होत असताना दुसरीकडे मात्र घरपट्टीच्या थकबाकीचा डोंगर तब्बल ७३५ कोटी रुपयांच्यावर पोचला आहे. यात ३२४ कोटी रुपये निव्वळ थकबाकीची रक्कम असल्याने विविध कर विभागाला थकबाकी वसुलीसाठी विशेष प्रयत्न करावे लागणार आहेत.