गंगापूर समांतर रस्ता भुमिपूजन

गंगापूर समांतर रस्ता भुमिपूजन
Published on: 
टूडे मेन फोटो : B61147 --------------------------- सिंहस्थाची निकृष्ट काम करणाऱ्यांवर कारवाई उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते गंगापूर समांतर रस्त्याचे भूमिपूजन सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. २६ : सिंहस्थ कुंभमेळा महाराष्ट्राचा अभिमान आहे. कुंभमेळ्यानिमित्त विकासकामांसाठी शासनाने ३५ हजार कोटींचा निधी दिला असून ही कामे वेळेत आणि दर्जेदार व्हावीत, गुणवत्तेशी कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही, निकृष्ट काम करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला. विरोधकांनी टीका करण्याऐवजी सिंहस्थाच्या यशस्वितेसाठी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. गंगापूर रस्त्यावरील वाढती वाहतूक लक्षात घेता उपमहापौर विलास शिंदे यांच्या प्रभागात गंगापूर रस्त्याला भोसला महाविद्यालयापासून समांतर रस्ता तयार केला जाणार आहे. त्या रस्त्याचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते सोमवारी (ता. २६) पार पडले. या वेळी ते बोलत होते. याप्रसंगी कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन, शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे, महापौर हिमगौरी आडके, आमदार सीमा हिरे, गोकुळ गिते, शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी, उपनेते व गटनेते अजय बोरस्ते, आयुक्त मनिषा खत्री, माजी महापौर दशरथ पाटील, नगरसेविका उषा बेंडकुळे, कविता लोखंडे, अंकिता शिंदे आदी व्यासपीठावर उपस्थित होते. उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी चांगले रस्त्यांची आवश्‍यकता आहे. चांगल्या व प्रशस्त रस्त्यांमुळे शहराची प्रगती वेगाने होते. या नव्या समांतर रस्त्यामुळे गंगापूर रोड परिसरातील नागरिकांना वाहतूक कोंडीतून दिलासा मिळेल व प्रवास वेगाने होईल. प्रस्तावित समांतर रस्त्याला उपमहापौर विलास शिंदे यांच्या मातोश्री स्व. अनसूया शिंदे यांचे नाव दिल्याने त्यांचे स्मरण कायम राहील. सिंहस्थामुळे रस्ते, वाहतूक व्यवस्था आणि पायाभूत सुविधांचे मोठे जाळे उभे राहणार आहे. विकासकामांसाठी केंद्र सरकार कडून भक्कम पाठबळ मिळतं आहे. विकासकामांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. देशभरातून येणाऱ्या लाखो भाविकांची गैरसोय होणार नाही याची हे पाहिले जात असून समस्त नाशिककरांचीदेखील जबाबदारी आहे. ---चौकट सर्वांनी सहकार्याची भूमिका घ्यावी सिंहस्थ कुंभमेळा श्रध्देचा, अस्मितेचा विषय असल्याने त्यात सत्ताधारी- विरोधक असा भेद बाळगता कामा नये, सिंहस्थ यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी सर्वांनी सहकार्याची भूमिका घ्यायला हवी, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. दुष्काळाच्या पार्श्‍वभूमीवर सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असून, समृद्धी महामार्गाप्रमाणे राज्यभर विकासकामांना गती दिली जात असल्याचे त्यांनी सांगितले. उपमहापौर विलास शिंदे यांनी घंटागाडी, मलेरिया, वाहनचालकांसह सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना महापालिकेत कायम करावे आणि संत कबीरनगर झोपडपट्टी अधिकृत स्लम घोषित करावी, अशा दोन मागण्या केल्या. यावर प्रस्ताव नगरविकास विभागाला पाठवा तत्काळ मान्यता देण्याची घोषणा केल्यानंतर नागरिकांनी टाळ्यांतून प्रतिसाद दिला. ---------------चौकट उपमहापौरांना अश्रू अनावर प्रास्ताविक करताना उपमहापौर विलास शिंदे भावुक झाले. तब्बल ६५ कोटी रुपये खर्चाचा हा रस्ता नाशिकच्या विकासासाठी महत्त्वाचा असल्याचे त्यांनी सांगितले. या रस्त्याला ‘स्व. मातोश्री अनसूया रामदास शिंदे मार्ग’ असे नाव दिले असले तरी आईचे ऋण यातून फिटणार नाही, असे सांगताना त्यांना अश्रू अनावर झाले. माझ्यासारख्या साध्या कार्यकर्त्याला एकनाथ शिंदे यांनी नगरसेवक आणि उपमहापौर केले, आईचे स्वप्न पूर्ण केले, असे त्यांनी नमूद करत या रस्त्यासाठी सर्व लोकप्रतिनिधींनी मदत केल्याचे सांगत श्रेयवादावर पडदा टाकला. ------------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com