Nashik Kumbh Mela
sakal
Nashik Kumbh Land Issue : सिंहस्थ- कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक- त्र्यंबकेश्वर परिसरात राबविण्यात येणाऱ्या विविध महत्त्वाकांक्षी प्रकल्पांसाठी आवश्यक भूसंपादनास स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध वाढत असून, त्यामुळे प्रकल्प रखडण्याची भीती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर भूसंपादनाच्या संथ गतीबाबत विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.