ध्वजारोहण सोहळा लेख- उपमहापौर विलास शिंदे

ध्वजारोहण सोहळा लेख- उपमहापौर विलास शिंदे
Published on: 
ध्वजारोहण सोहळा लेख -------------------- समृद्ध नाशिकच्या विकासाची पायाभरणी लीड नाशिक-त्र्यंबकेश्‍वर कुंभमेळ्याच्या माध्यमातून भविष्यातील नाशिकच्या विकासाचा मजबूत पायाभरणी करण्याची संधी लाभणार आहे. सिंहस्थानिमित्त नाशिकची प्रगती वेगाने होणार असून, केंद्र व राज्य शासनाचे मोलाचे आर्थिक पाठबळ, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांच्या अविरत प्रयत्नांतून नाशिकचा विकास आराखडा बलशाली नाशिकची निर्मिती करणारा आहे. -विलास शिंदे, उपमहापौर, नाशिक ----------------- कुंभमेळा हा केवळ स्नानाचा सोहळा नाही, तर नाशिकचे भविष्य बदलणारा आहे. ३१ ऑक्टोबर २०२६ ला ध्वजारोहणाने कुंभमेळ्याचा शंखनाद होईल. पुढे वर्षभर मुख्य पर्वकाळ असेल. कुंभमेळ्यानिमित्त कोट्यवधी भाविक नाशिक व त्र्यंबकेश्‍वरमध्ये दाखल होतील. त्याच अनुषंगाने भाविकांना सुविधा पुरविण्याची तयारी महापालिकेने केली आहे. या सुविधा पुढील पन्नास वर्षांच्या शहर नियोजनाची सुवर्णसंधी ठरणार आहे. शासनाने सढळहस्ते ३७३ कामांसाठी सुमारे ३५ हजार कोटींची गुंतवणूक केल्याने शहर विकासाला मोठी चालना मिळणार आहे. कुंभमेळ्यानिमित्त पायाभूत सुविधांचे जाळे निर्माण होईल. त्याचा फायदा नाशिककरांना होईल. त्याव्यतिरिक्त वाइन, कृषी पर्यटन, हॉटेल, ट्रॅव्हल्स व्यवसायाला बळ मिळणार आहे. प्रत्येकाला यानिमित्ताने रोजगार प्राप्त होईल. नाशिककरांना आर्थिक विकासाची पर्वणी साधता येईल, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून रामकाल पथ साकारला जात आहे. हे फक्त सुशोभीकरण नाही, तर काळाराम मंदिराच्या मराठा शैलीतील कमानी, दगडी नक्षीकाम यातून प्रेरणा घेऊन रामतीर्थ, कपालेश्वर, सीतागुंफा परिसराला एकसंध लुक दिला जात आहे. त्यामुळे नाशिकची ओळख असलेल्या रामतीर्थ, श्री काळाराम मंदिर परिसरात भाविक अधिक काळ रमेल यात शंका नाही. विकासाच्या अंगाने बघितल्यास वाढत्या नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा निर्माण होणार आहेत. मुंबई, पुण्यानंतर नाशिकच्या वाढीचा वेग अधिक आहे. स्वच्छ हवा, अरुंद रस्ते, मुबलक पाणी यामुळे ज्येष्ठ नागरिक नाशिकमध्ये वास्तव्याला प्राधान्य देतात. वाढत्या नाशिकची गरज लक्षात घेऊन सिंहस्थ कुंभमेळा वरदान ठरणार आहे. २०५५ मध्ये नाशिकला किती पाण्याची गरज भासेल याचा विचार करून विल्होळी येथे २७४ एमएलडीचा स्काडा-ऑटोमेटेड प्रकल्प आणि मुकणे येथे ४५२ दशलक्ष लिटर क्षमतावाढ केली जात आहे. २२० किलोमीटर जुने गळके पाइप काढून ५० वर्षे टिकणारे पाइप टाकले जात आहेत. --- कायमस्वरूपी लाभ शहरात ३१ रस्त्यांची कामे सुरू आहेत. रस्ते तयार करताना ओएफसी, गॅस, वीज, पाणी, ड्रेनेज एकाच वेळी टाकले जात आहे. औद्योगिक वसाहतीतील रस्ते काँक्रीटचे तयार केले जात आहे. कुंभमेळ्यात शहराची सुरक्षितता लक्षात घेऊन चार हजार ११ कॅमेरे, ३७८ किलोमीटर फायबर, तीन कमांड सेंटर उभारली जात आहेत. याचा लाभ नाशिकला सिंहस्थापुरता राहणार नाही, तर पुढेदेखील या सोयी नाशिकसाठी उपलब्ध राहणार आहेत. या माध्यमातून नाशिक महापालिकेला उत्पन्नदेखील मिळणार आहे. तपोवनात एक हजार ४६८ एकर जागेवर साधुग्राम उभारताना तेथे पायाभूत सुविधा पुरविल्या जात असल्याने त्याचा लाभ कायमस्वरूपी मिळणार आहे. एसटी बसस्थानकांचे आधुनिकीकरण, नाशिक रोड, देवळाली कॅम्प, ओढा व कसबे सुकेणे रेल्वेस्थानकांचा विस्तार व आधुनिकीकरण या सेवा नाशिकला कायमस्वरूपी मिळणार आहेत. ------------------- गंगापूरचा पर्यायी रस्ता ठरेल वरदान विकासाचा भाग म्हणून गंगापूर रोडची कोंडी फोडण्यासाठी एक महत्त्वाचा निर्णय झाला आहे. गंगापूर रोडवर भूसंपादन अडकल्याने महापालिकेने पर्यायी मार्ग काढला आहे. भोसला महाविद्यालय ते कबीरनगर झोपडपट्टीमार्गे बारदान फाटा असा हा मार्ग आहे. सध्या नऊ मीटर असलेला हा रस्ता १५ मीटर केला जाणार असून, कबीरनगरमध्ये १२ मीटर होईल. यासाठी ६६ कोटींचा प्रस्ताव शासनाने मंजूर केला आहे. आनंदवली, पाइपलाइन रोडकडून येणारी वाहतूक थेट महात्मानगर, कॉलेज रोडकडे वळल्याने गंगापूर रोडचा श्वास मोकळा होईल. म्हणजेच, सिंहस्थ म्हणजे केवळ पर्वणी स्नान नाही तर नाशिकच्या विकासासाठी मैलाचा दगड ठरेल. ६६ किलोमीटर आउटर रिंग रोड, शिव-राम मार्ग बससेवा, एक लाख वृक्षलागवड आणि प्लॅस्टिकमुक्त, हरित कुंभाचा संकल्प आहे. हीच खरी पुढील पन्नास वर्षांच्या बलशाली नाशिकची पायाभरणी आहे. ------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com