Nashik Kumbh Mela
sakal
नाशिक: आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने महावितरणकडून ३३/११ किलोवॉटचे चार उपकेंद्र उभारण्यात येणार आहेत. त्यामध्ये नाशिक शहरातील तीन व त्र्यंबकेश्वरमधील एका उपकेंद्राचा समावेश आहे. या उपकेंद्रांमुळे सिंहस्थामध्ये अखंडित वीजपुरवठा उपलब्ध होईल.