Panchavati
sakal
नाशिक: एव्हाना कुंभमेळ्याची कामे अत्यंत जोरात सुरू झाली आहेत. मुख्य म्हणजे पंचवटी परिसरात तर युद्धपातळीवर कामे सुरू असून रोजच पाडकाम होत आहे. या सर्व कामांमध्ये अनेक मंदिरेही असून, देवालयातील मूर्तीच्या विस्थापनाचा नाजूक विषय पुढे येत आहे. जुनी मंदिरे काढून नवी बांधून मिळणार असली तरीही मूर्ती मात्र तिच राहणार आहे आणि हे काम होईपर्यंत मूर्ती ठेवायच्या कोठे असा मोठा प्रश्न प्रशासनापुढे पर्यायाने मंदिरांशी संबंधित सर्वांपुढेच पडला आहे.