नाशिक: सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी वर्षभर तसेच विशेष करून पर्वणीच्या दिवशी भाविकांच्या वाढत्या गर्दीचे नियोजन करण्यासाठी महापालिकेकडून वाहनतळ (पार्किंग) आराखडा तयार करण्यात आला आहे. विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्याकडे मंगळवारी (ता. २) नियोजित बैठकीत सादरीकरण केले जाणार आहे.