एखादी समस्या निर्माण झाल्यावर त्यातून मार्ग काढावे लागतात. व्यक्ती किंवा संस्था जबाबदार असेल, तर त्या घटकाने निःस्पृहपणे जबाबदारी पार पाडली पाहिजे. अन्यथा संशय, वाद यांसारखे प्रश्न अधिक तीव्र स्वरूप धारण करतात. सिंहस्थ कुंभमेळा, नाशिक महापालिका व शासन या तिन्ही बाबतींत अडचणी सुटण्याऐवजी त्या वाढतानाच दिसत आहेत. महापालिकेत शासनाने तिसरा अतिरिक्त आयुक्त नियुक्त करून मार्ग काढायचाच नाही, असे धोरण आखल्याचे दिसते.