Neelkantheshwar Temple
sakal
नाशिक: कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर गोदाघाटावरील निळकंठेश्वर मंदिराचे काम पूर्ण होत आले असून, नारोशंकर सभामंडपावरील काम प्रगतिपथावर आहे. गोदावरी घाटाच्या मध्यभागी वसलेले निळकंठेश्वर मंदिर सध्या संरक्षक थर लावण्याच्या टप्प्यात आहे. भिंती, छत व पृष्ठभागावर या थराचे काम सुरू असून, त्यानंतर साफसफाई सुरू होणार आहे. पुढील टप्प्यात मंदिराच्या खालच्या भागातील दगडांची पुनर्स्थापना केली जाणार असून, यामुळे मंदिराचे मूळ स्थापत्य रक्षण आणि स्थायित्व सुनिश्चित होईल, असे पुरातत्त्व विभागाने सांगितले आहे.