

Kumbh Mela Scam
Esakal
नाशिक, ता. १२ : सिंहस्थ कुंभमेळ्याची निविदा आणि कामे मंजूर करून देण्याचे आमिष दाखवून एका कंपनीची तीन कोटी पाच लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी दोघा संशयितांना शहर गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. जामनेर (जि. जळगाव) येथून संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याविरुद्ध नाशिक रोड पोलिस ठाण्यात विविध कलमांनुसार तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तनय अनंत महाजन (३२, रा. पाचोरा रोड, जामनेर, जि. जळगाव), नरेंद्र तुकाराम महाजन (५१, रा. नवसखा, देशमुख गल्ली, जामनेर, जि. जळगाव) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे असून, संशयित शकील अहमद सलीम्मुद्दीन शेख हा फरारी आहे.