कुंभमेळ्यासाठी शनिशिंगणापूर सज्ज!

कुंभमेळ्यासाठी शनिशिंगणापूर सज्ज!
Published on: 
(ध्वजारोहण विशेष पुरवणीसाठी) फोटो : H33853 कुंभमेळ्यासाठी शनिशिंगणापूर सज्ज! ------------------------------ पानसनाला घाटप्रकल्प ठरणार आकर्षण लीड कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शनिशिंगणापूर येथे भाविकांच्या वाढत्या गर्दीचे नियोजन करण्यात येत आहे. २०१५ मधील कुंभमेळ्यातील वाहतूक कोंडी, अपुऱ्या सुविधा आणि दर्शन व्यवस्थेतील त्रुटींचा अनुभव लक्षात घेऊन शनैश्वर देवस्थान ट्रस्ट व प्रशासनाने रस्ते, पिण्याचे पाणी, आरोग्यसेवा, निवास आणि सुलभ दर्शनासाठी आराखडा तयार केला आहे. त्यातच ५८ कोटी रुपये खर्चाचा पानसनाला घाट सुशोभीकरण प्रकल्प पूर्ण झाल्याने शनिक्षेत्राच्या वैभवात भर पडली असून, कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या भाविकांसाठी हे नवे आकर्षण ठरणार आहे. -विनायक दरंदले, सोनई शनैश्वर देवस्थानचे प्रशासक व विभागीय आयुक्त डाॅ. प्रवीण गेडाम यांच्या सूचनेनुसार अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी डाॅ. पंकज आशिया, जिल्हा व तालुका प्रशासन तसेच देवस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी अतुल चोरमारे व विभागप्रमुखांनी रस्ते, पिण्याचे पाणी, आरोग्य सुविधा, राहण्याची व्यवस्था तसेच रस्त्यावर वाहतूक कोंडी व मंदिरात सुलभ दर्शन व्हावे याकरिता आराखडा तयार केला आहे. शनिशिंगणापूर येथे आलेल्या भाविकांसाठी जवळच प्रसिद्ध असलेले रेणुकादरबार (काचमंदिर) आहे. नेवासे येथे पैसखांब मंदिर, नारदमुनी व म्हाळसा-खंडोबाचे पुरातन मंदिर व जगातील एकमेव मोहिनीराज मंदिर आहे. देवगड येथील भगवान दत्तात्रेय मंदिर तसेच प्रवरासंगम क्षेत्र पाहण्यासारखे आहे. स्वयंभू शनिमूर्ती वाहून आलेल्या पानसनाल्याला आलेले गटारीचे स्वरूप लक्षात घेऊन ट्रस्टने ५८ कोटी रुपये खर्चाचे पानसनाला सुशोभीकरण प्रकल्प हाती घेतला असून, याचे काम पूर्ण झाले आहे. प्रकल्पात देवस्थान वाहनतळापासून दर्शनरांग असणार आहे. मार्गावर दुतर्फा कोरीवकाम केलेले ७५ शिल्पसौंदर्याने नटलेले पाषाणी स्तंभ बसविण्यात आले आहेत. हे काम राज्यातील इतर मंदिरांकरिता भूषण ठरावे असेच आहे. शनिदर्शनानंतर भाविक येथून लगेच जातो. आता हाच भाविक या प्रकल्पानंतर तीन ते चार तास नक्कीच थांबल्यास गावात व्यवसायवृद्धी होईल. याशिवाय २३ फूट उंचीचे व तीस टन वजनाचे आठ स्तंभ उभारले आहेत. एकूण सातशे दहा मीटर लांबीच्या घाट प्रकल्पावरील बाजूस एक जलबंधारा व त्यावर सात पाषाणी मंदिरे करण्यात आली आहेत. महाद्वारासमोर ७२ फूट उंचीचा नवग्रहस्तंभ पूर्ण झाला असून, हा स्तंभ शनिशिंगणापूरच्या वैभवात भर टाकणारा ठरत आहे. या स्तंभावर नवग्रह देवता स्थापन करण्यात आलेले आहे. कुंभमेळ्यानिमित्त येणाऱ्या भक्तांकरिता हा प्रकल्प लक्षवेधी ठरेल असाच निर्माण करण्यात आलेला आहे. -- येथे होणारे उत्सव... -शनिवारी येणाऱ्या अमावस्येला यात्रा -शनिजयंती उत्सव -शनिप्रदोष, शनिपालट -उदासी महाराज पुण्यतिथी -गुढीपाडवा यात्रा -श्रावण उत्सव -- कसे जाल? अहिल्यानगर-संभाजीनगर महामार्गावर घोडेगाव आहे. येथून चार किलोमीटर अंतरावर शनिशिंगणापूर आहे. बस, रिक्षाची सुविधा आहे. अहिल्यादनगर, शिर्डी, राहुरी येथून बस व खासगी वाहनांची सोय आहे. -- कोट... कुंभमेळा पर्वात अमावस्या यात्रेप्रमाणे नियोजन करण्यात आले आहे. चौथरा परिसरात गर्दी होऊ नये याकरिता महाद्वार येथेच तेल व पूजासाहित्य घेण्याची व्यवस्था व तेथे स्क्रीन लावली जाणार आहे. वाहनतळ येथून चार स्वतंत्र दर्शनरांगा व पर्यायी मार्ग असतील. चौकशी व आरोग्य कक्ष सर्व रस्त्यांवर राहतील. -अतुल चोरमारे, मुख्य कार्यकारी अधिकारी, शनैश्वर देवस्थान

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.