Kumbh Mela
sakal
नाशिक: नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे २०२६-२७ दरम्यान होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यात स्वयंसेवक म्हणून, तसेच शैक्षणिक अभ्यासक्रमाचा भाग म्हणून सेवा देणाऱ्या विद्यार्थ्यांना सामाजिक कार्यासाठी दोन शैक्षणिक गुण (अॅकॅडमिक क्रेडिट्स) देण्यात येणार आहेत. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या दिशादर्शक तत्त्वांनुसार हा निर्णय घेण्यात आला असून, त्यास सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्या परिषद बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे.