नाशिक: राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रस्ते कामाच्या २२७० कोटी रुपयांच्या कामांची निविदा प्रसिद्ध करताना त्यात क्लब टेंडरींग झाल्याचा प्रकार उघड झाला आहे. या क्लब टेंडरींगच्या कामाची सखोल चौकशीचे निर्देश अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांना दिले. मल जलशुद्धीकरण केंद्रांच्या कामांच्या निविदांमधील कथित घोळासंदर्भात पडताळणीच्या सूचना केल्या.