Girish Mahajan
sakal
नवीन नाशिक: आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात नवीन पंधरा हजार वृक्षांची लोकसहभागातून लागवड करून त्यांचे संवर्धन करण्यात येणार असल्याची माहिती कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांनी दिली. बहुचर्चित पेलिकन पार्क येथे शुक्रवारी (ता. ५) दुपारी वृक्षारोपणाच्या कार्यक्रमासाठी नियोजित जागेची त्यांनी पाहणी केली. त्यावेळी ते बोलत होते.