नाशिक: कुंभमेळ्यानिमित्त होत असलेल्या विकासकामांमध्ये क्लब टेंडरचा घाट घातला जात आहे. आतापर्यंत तेराशे कोटी रुपयांची कामे वाटप झाली आहेत. यामध्ये काही निवडक कामे सोडल्यास उर्वरित सर्व कामे परराज्यातील ठेकेदारांकडे गेली आहेत. या माध्यमातून स्थानिक व छोट्या व मध्यम कंत्राटदारांमध्ये अन्यायाची भावना निर्माण झाली आहे. क्लब टेंडरमध्ये महाराष्ट्रबाहेरील कंपन्यांना वरिष्ठ पातळीवरून ‘अर्थ’पूर्णरीत्या कामांचे वाटप करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे पुन्हा एकदा प्रांतवाद निर्माण होणार आहे.