नशिराबादला कुंभार समाजाच्या समाजगृहाचे उद्घाटन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लोकार्प

नशिराबादला कुंभार समाजाच्या समाजगृहाचे उद्घाटन
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लोकार्प
Published on: 
नशिराबादला कुंभार समाजाच्या समाजगृहाचे उद्घाटन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लोकार्पण सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. ९ : येथील खालची आळी, कुंभारवाडा परिसरात समस्त कुंभार समाज व पंच परिवाराच्या वतीने उभारण्यात आलेल्या ‘श्री संत शिरोमणी गोरोबा काका महाराज समाजगृहा’चा उद्घाटन सोहळा सोमवारी (ता. ९) उत्साहात पार पडला. राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते समाजगृहाचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात विधिवत पूजन आणि संत शिरोमणी गोरोबा काका यांच्या प्रतिमेला अभिवादन करून झाली. यावेळी संत गोरोबा काका यांच्या जीवनकार्याचे स्मरण करण्यात आले. समाजाच्या एकजुटीतून उभारण्यात आलेले हे समाजगृह सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक उपक्रमांसाठी उपयुक्त ठरेल, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुंभार समाजाचे नशिराबाद अध्यक्ष संतोष बाळू कुंभार व उपाध्यक्ष प्रल्हाद पंडित कुंभार होते. यावेळी संस्थापक अध्यक्ष मोहनराव जगदाळे, प्रदेशाध्यक्ष बाळवंतशेठ कुंभार, प्रभारी नगराध्यक्ष पंकज महाजन, नगराध्यक्ष योगेश नारायण पाटील, नगरसेवक कीर्तीकांत चौबे, विकास धनगर, सचिन महाजन, लालचंद पाटील, चेतन बऱ्हाटे, पराग नारखेडे, सचिन पवार चांदसकर तसेच सहाय्यक पोलिस निरीक्षक योगिता नारखेडे उपस्थित होते. याशिवाय पद्माकर शिरसाठ, योगेश हिवरकर, राजेंद्र खैरे, समाधान कुंभार, समाधान हिवरकर, मुरलीधर न्हावककर, हर्षल प्रजापती बाविस्कर, भगवान शेठ, चंद्रशेखर कापडे, सुभाष पंडित, सखाराम मोरे, देविदास कुंभार, सुकलाल कुंभार आणि प्रदीप संतोष कुंभार यांच्यासह विविध पदाधिकारी व समाजातील मान्यवर उपस्थित होते. समाजातील बांधवांना एकत्र येण्यासाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे, तसेच सामाजिक उपक्रमांना चालना मिळावी, या उद्देशाने समाजगृहाची उभारणी करण्यात आली आहे. या उद्घाटन सोहळ्यास परिसरातील नागरिक व समाजबांधवांनी सहकुटुंब मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. समस्त कुंभार पंच मंडळ, महाराष्ट्र कुंभार समाज महामंडळ व विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.