दिघावकर घराण्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; कुणालची PSI पदाला गवसणी

Kunal dighavkar
Kunal dighavkaresakal

सटाणा (जि. नाशिक) : जीवनात अनेक कठीण प्रसंग येतात. प्रत्येक क्षणाला घड्याळाच्या काट्याप्रमाणे जीवन आपली परीक्षा घेत असते. मात्र ज्यांचे इरादे मजबूत असतात ते ही परीक्षा एक आव्हान म्हणून स्वीकारतात. आणि असेच लोक इतिहास घडवतात. धाडस, संयम आणि प्रयत्नांच्या पराकाष्ठाचे ज्वलंत उदाहरण ठेवले आहे, येथील कुणाल पोपटराव दिघावकर (अहिरे) या तरुणाने. कुणालने अत्यंत खडतर परिस्थितीत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत इतर मागास प्रवर्गातून ११ व्या रॅंकने उत्तीर्ण होत पोलिस उपनिरीक्षकपदाला (PSI) गवसणी घातली आहे. त्याच्या या यशामुळे दिघावकर घराण्याच्या शिरपेचात मानाचा अजून एक तूरा रोवला आहे.

बागलाण तालुक्यातील दिघावकर घराण्यात जणू अधिकारी घडविण्याची परंपराच आहे. कुणालचे काका पोलिस दलात सेवेत असल्याने मोठे झाल्यावर आपण सुद्धा पोलिस दलात भरती व्हावे आणि देशसेवा करावी या जिद्दीने बालपणापासूनच कुणालने ध्येय निश्चिती केली होती. त्यानंतर कठोर मेहनत, जिद्द आणि परिश्रमाच्या बळावर त्याने पोलिस उपनिरीक्षकपदाला गवसणी घालून मोठे यश मिळवले आहे. कुणालचे दहावीपर्यंतचे शिक्षण सटाणा येथील लोकनेते पं. ध. पाटील मराठा इंग्लिश स्कूलमध्ये झाले. नाशिक येथील के. टी. एच. एम. महाविद्यालयात उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर येवला येथे अभियांत्रिकी पदवीचे शिक्षण घेतले. याच दरम्यान त्याने स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासाची तयारी सुरू केली होती.

Kunal dighavkar
Job Interview: नोकरीसाठी मुलाखत उत्तम व्हावी असं वाटतंय? या तीन टिप्स लक्षात ठेवा

२०१६ मध्ये तो पोलिस उपनिरीक्षक पदाची मुख्य परीक्षा उतीर्ण झाला, मात्र शारीरिक दुखापतीमुळे ऐन वेळी त्याला शारीरिक चाचणीस मुकावे लागले. यानंतर २०१७ मध्ये त्याने पुन्हा मुख्य परीक्षा दिली. यामध्ये उत्तीर्ण होत त्याने पोलिस उपनिरीक्षकपदाची मुलाखत दिली. मात्र यावेळी सुद्धा यशाने त्याला थोडक्यात हुलकावणी दिली. परंतु त्याने खचून न जाता पुन्हा जिद्दीने मेहनत करून अभ्यास सुरू ठेवला. २०१९ मध्ये त्याने पुन्हा पोलिस उपनिरीक्षकपदाची पूर्व व मुख्य परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होत शारीरिक चाचणीचा सराव सुरू केला. मात्र याचवेळी सुरू असलेला मराठा आरक्षणाचा घोळ आणि सुरू झालेला कोरोना संकट काळ यामुळे दोन वर्षे कुणालला प्रतीक्षा करावी लागली. या परिस्थितीत जिद्द न सोडता त्याने सातत्याने सरावावर भर दिला आणि अखेर यश मिळविलेच. कुणालचे वडील पोपटराव अहिरे (दिघावकर) हे मविप्र संस्थेच्या निताणे (ता.बागलाण) येथील नूतन इंग्लिश स्कूलमधून निवृत्त झाले असून आई श्रीमती एम.पी.अहिरे ह्या येथील जिजामाता गर्ल्स हायस्कूलमध्ये उपशिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. खडतर परिस्थितीत साथ देणारे आई-वडिल आणि मोठा भाऊ तुषार यांना कुणालने त्याच्या यशाचे सर्व श्रेय दिले आहे.

Kunal dighavkar
सरकारी वकील होण्यासाठी 'ही' परीक्षा द्यावी लागते; पगार अन् पात्रता जाणून घ्या

''मनात जर संयम असेल व प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याची जिद्द असेल तर निश्चित यशाचे शिखर गाठता येते. याचा अनुभव मी घेतला आहे. प्रामाणिकपणे अभ्यास करून कष्ट करण्याची तयारी ठेवली तर जीवनाच्या कोणत्याही परीक्षेतयशस्वी होता येते.'' - कुणाल दिघावकर, पोलिस उपनिरीक्षक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com