CM Devendra Fadnavis and Kumbhmela commissioner Shekhar Sinh
sakal
नाशिक - सिंहस्थ कुंभमेळ्यात धार्मिक महत्त्व असलेल्या त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्त कुंडातील पाणी स्वच्छ, निर्मळ आणि निर्जंतुक करण्यासाठी कुंभमेळा प्राधिकरणाने विश्वराज फाउंडेशनसोबत करार केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत नाशिकमध्ये बुधवारी (ता. ६) झालेल्या कुंभ उद्योग संगम व नाशिक जिल्हा गुंतवणूक परिषदेत प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह व फाउंडेशनचे संचालक सारंग लखानी यांनी कराराचे आदान-प्रदान केले.