Kumar Ambuj : हिंदी कवी कुमार अंबुज यांना यंदाचा कुसुमाग्रज राष्ट्रीय साहित्य पुरस्कार
Announcement of Kusumagraj National Literary Award 2025 : कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या नावाने यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे दिला जाणारा यंदाचा 'कुसुमाग्रज राष्ट्रीय साहित्य पुरस्कार' हिंदी कवी कुमार अंबुज यांना जाहीर.
नाशिक: यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे दिल्या जाणाऱ्या कुसुमाग्रज राष्ट्रीय साहित्य पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. या प्रतिष्ठित पुरस्कारासाठी हिंदी कवी कुमार अंबुज यांची निवड करण्यात आली आहे.