Nashik Crime News : मालेगावला दहा हजाराची कुत्ता गोळी जप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime News

Nashik Crime News : मालेगावला दहा हजाराची कुत्ता गोळी जप्त

मालेगाव (जि. नाशिक) : शहरातील जमहूर हायस्कूलजवळ सहाय्यक पोलिस अधिक्षक तेगबीरसिंह संधू यांच्या विशेष पथकाने छापा टाकून सुमारे दहा हजार ८० रुपये किंमतीच्या २८० स्ट्रीप कुत्ता गोळी जप्त केली. (kutta goli worth ten thousand seized from Malegaon Nashik Crime News)

हेही वाचा : द मिसिंग टाइल सिंड्रोम ठेवा आपल्यापासून दूर

हेही वाचा: Jalgaon Crime News : पोलिस ठाण्यातून संशयित निसटले; शस्त्र, रॉडचा वापर, तरी हाणामारीच दाखल

या प्रकरणी रईस शाह रौफ शाह (वय ३०, रा. सलामताबाद) याला अटक करण्यात आली आहे. त्याच्या जवळील कापडी पिशवीत या गोळ्या मिळून आल्या. रईस मानवी शरीराला घातक नशाकारक व गुंगीकारक असलेल्या या गोळ्यांची अवैधरीत्या विक्री करीत असल्याने त्याच्याविरुद्ध उपनिरीक्षक रूपाली महाजन यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

श्रीमती महाजन, उपनिरीक्षक पारस तागड, पोलिस नाईक शिरोडे, ठाकूर, बिऱ्हाडे, पाटील, बुरकूल आदींनी पोलिस अधिक्षक शहाजी उमाप, अपर पोलिस अधिक्षक अनिकेत भारती, श्री. संधू यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली

हेही वाचा: Agniveer News: दुश्मनकी सेना देंगे चीर, हम है अग्निवीर! पहिल्या तुकडीला तोफखान्यात प्रशिक्षण