Labour Federation Election : भुजबळ, कोतवालांची सरशी; कोकाटे, दराडेंना धक्का!

Winning candidates cheering after the counting of votes in District Labor Federation elections
Winning candidates cheering after the counting of votes in District Labor Federation electionsesakal

नाशिक : जिल्हा मजूर संस्थांच्या संघ फेडरेशनच्या प्रतिष्ठेच्या निवडणुकीत सिन्नर तालुक्यात आमदार अॅड. माणिकराव कोकाटे, तर येवला मतदारसंघात आमदार नरेंद्र दराडे, किशोर दराडे यांना धक्का बसला आहे. माजी मंत्री छगन भुजबळ यांची येवल्यात, माजी आमदार राजाभाऊ वाजे, उदय सांगळे यांची सिन्नरमध्ये, तर चांदवडमध्ये माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल यांची सरशी झाली आहे.

नाशिक तालुक्यांतून सतत तीन पंचवार्षिक निवडून येणारे योगेश (मुन्ना) हिरे यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. शर्मिला कुशारे यांनी त्यांचा १६ मतांनी पराभव केला. (Labor Federation News Bhujbal Kotwal elected shock to Kokate darade nashik news)

या निवडणुकीत राजेंद्र भोसले यांच्या पॅनलचा दारूरुण पराभव झाला असून, संतप सकाळे, केदा आहेर पॅनलची सरशी झाली आहे. या निवडणुकीसाठी ९६.७३ टक्के मतदान झाले होते. निवडणूक अधिकारी सुरेशगिरी महंत यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी (ता. २६) सकाळी मतमोजणीस प्रारंभ झाला. दुपारी अकरापर्यंत सर्व मतमोजणी पूर्ण होऊन महंत यांनी विजयी उमेदवारांची घोषणा करत प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. आपलं पॅनलमागे फेडरेशनवर वर्चस्व असलेले राजेंद्र भोसले यांनी ताकद पणाला लावली होती.

त्यांच्या पॅनलचे शशिकांत उबाळे यांनी अनुसूचित जाती-जमाती गटातून बाजी मारली. रिंगणात उतरलेल्या सहकार पॅनलचे इतर मागास प्रवर्गातील अर्जुन चुंभळे व माजी संचालक राजाभाऊ खेमनार विजयी झाले. अनुसूचित जाती-जमाती गटातील किरण निरभवणे यांचा अवघ्या १३ मतांना पराभव झाला. महिला राखीव गटातून दीप्ती पाटील व कविता शिंदे विजयी झाल्या. या महिलांना भोसले, सकाळे, केदा आहेर यांचा पाठिंबा होता. पेठ तालुक्यातून सुरेश भोये यांनी सहा मते घेत विजय मिळवला.

केदा आहेर यांचे वर्चस्व असलेल्या देवळा तालुक्यात तीन उमेदवार रिंगणात होते. मात्र, प्रत्यक्ष मतदानानंतर ही निवडणूक एकतर्फी झाल्याचे दिसून आले. विद्यमान संचालक सतीश सोमवंशी यांनी ४५ पैकी ४४ मते घेत विजय मिळविला. सुरगाणा तालुक्यातून राजेंद्र गावित यांनी १२ मते मिळवली. नाशिक तालुका संचालकपदाच्या निवडणुकीत शर्मिला कुशारे यांनी योगशे हिरे यांचा १६ मतांनी पराभव केला. त्यांना ८५, तर हिरे यांना ६९ मते मिळाली.

Winning candidates cheering after the counting of votes in District Labor Federation elections
Nashik Crime News : कामगारानेच फोडले Sagar Sweets! 22 लाखांची रोकड जप्त

बिनविरोध निवड झालेले

संपत सकाळे (त्र्यंबकेश्वर), राजेंद्र भोसले (मालेगाव), रोहित पगार (कळवण), शिवाजी रौंदळ (सटाणा), अमोल थोरे (निफाड), प्रमोद मुळाणे (दिंडोरी), प्रमोद भाबड (नांदगाव), ज्ञानेश्वर लहांगे (इगतपुरी).

विजयी उमेदवार व मते

इतर मागासवर्गीय प्रवर्ग ः पवन आहिरराव (३०९), अर्जुन चुंभळे (३८२), संदीप थेटे (३१२), मिलिंद रसाळ (२). अनुसूचित जाती-जमाती - शशिकांत उबाळे (४०४), हेमंत झोले (२८), किरण निरभवणे (३९०), उत्तम भालेराव (१५), रविकांत भालेराव (१४५), अशोक रोकडे (१०).

भटक्या विमुक्त जाती-जमाती ः बन्सीलाल कुमावत (२), राजाभाऊ खेमनार (४११), आप्पासाहेब दराडे (२८६), सुरेश देवकर (५), सुदर्शन सांगळे (३०१). महिला राखीव प्रतिनिधी (दोन जागा) ः दीप्ती पाटील (७२६), अनिता भामरे (३९८), कविता शिंदे (६४८).

येवल्यात भुजबळ कायम

येवलामध्ये सविता धनवटे व मंदा बोडके यांच्यात लढत झालेली असली, तरी त्यामागे माजी मंत्री छगन भुजबळ विरुद्ध आमदार नरेंद्र दराडे, किशोर दराडे असा थेट सामना रगंला होता. धनवटे यांच्यामागे भुजबळ यांनी ताकद पणाला लावली होती, तर बोडके यांच्यासाठी दराडे, संभाजी पवार, माणिकराव शिंदे हे त्रिमूर्ती रिंगणात उतरले होते. यात धनवटे यांना ५४, तर बोडके यांना ३४ मते मिळाली.

धनवटे यांनी तब्बल २० मतांनी बोडके यांचा पराभव करत, भुजबळ यांनी आपले बळ दाखवून दिले. धनवटे यांची बिनविरोध निवड निश्चित झालेली असताना दराडे, शिंदे व पवार यांनी एकत्र येत बोडके यांना रिंगणात उतरविले. सुरवातीस बोडके यांचे पारडे जड होते. मात्र, भुजबळ यांचे समर्थक दिलीप खैरे प्रत्यक्ष रिंगणात उतरले अम् त्यांनी केलेले सूक्ष्म नियोजन कामी आले. त्यामुळे दराडे, शिंदे व पवार एकत्र येऊनही भुजबळ त्यांना भारी पडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

हेही वाचा : Love Jihad: प्रेमाला धर्म आहे...?

Winning candidates cheering after the counting of votes in District Labor Federation elections
Nashik ZP News : ‘जलसंधारण’ची हनुमानउडी वादात! निधी 48.90 लाखांचा प्रशासकीय मान्यता 2 कोटींची

आमदारांना बंधू ठरले वरचढ

सिन्नरमध्येही आमदार कोकाटे यांचे बंधू भारत कोकाटेंविरुद्ध दिनकर उगले अशी सरळ लढत झाली. आमदार कोकाटे असो की भारत कोकाटे यांच्यामुळे मजूर फेडरेशनवर उगले यांचे सुरवातीपासूनच वर्चस्व राहिले. यंदा मात्र भारत कोकाटे यांनी तालुक्यातून रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला. त्या वेळी उगले यांनी जिल्हास्तरावर ओबीसीतून निवडणूक लढविण्याची तयारी केली.

मात्र, आमदार कोकाटे यांनी समर्थक उगले यांना तालुक्यातून रिंगणात उतरवत, बंधू भारत कोकाटे यांना शह देण्याचा प्रयत्न केला. उगले यांच्यासाठी आमदार कोकाटे यांनी ताकद पणाला लावत मतदारांचा कॅम्प जिल्हाबाहेर रवाना केला. परंतु, भारत कोकाटे यांच्यासाठी माजी आमदार राजाभाऊ वाजे, उदय सांगळे यांनी रिंगणात उतरून केलेले नियोजन व आमदार कोकाटे यांच्यावरील नाराजी भारत कोकाटे यांना मतांच्या रूपाने मिळाली. उगले यांच्या कॅम्पमध्ये गेलेल्या मतदारांनीदेखील भारत कोकाटे यांना पसंती दिल्याचे दिसून आल्याची चर्चा आहे.

चांदवडमध्ये कोतवालांची जादू कायम

चांदवडमध्ये शिवाजी कासव यांच्यासाठी माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल व शरद आहेर यांच्याकरिता भाजपचे डॉ. आत्माराम कुंभार्डे तसेच आमदार डॉ. राहुल आहेर रिंगणात उतरले होते. मात्र, कोतवाल यांनी आपली जादू कायम असल्याचे दाखवून दिले. जागा बिनविरोध व्हावी, यासाठी चिठ्ठी टाकण्यात आली. यामध्ये म्हसू कापसे यांची चिठ्ठी निघाली. त्यानुसार कापसे यांना बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा करून देत इतरांनी माघारी घेण्याचा निर्णय चिठ्ठी टाकण्यापूर्वी झाला होता.

मात्र चिठ्ठी निघाल्यानंतर शरद आहेर यांनी अर्ज मागे घेण्यास नकार देत थेट काढता पाय घेतला. त्यामुळे शिवाजी कासव यांनीही अर्ज कायम ठेवला. चिठ्ठी निघाल्यानंतर दगाफटका झाल्याने कोतवाल ताकदीनिशी रिंगणात उतरले, तर आहेर यांच्यासाठी डॉ. कुंभार्डे यांनी बाजी लावली. डॉ. कुंभार्डे यांच्यासोबत आमदार आहेरही रिंगणात उतरले. परंतु मतदारांनी कोतवाल यांच्यावरच विश्वास दाखविला.

खेमनार ठरले जॉइंट किलर

राजेंद्र भोसले, शिवाजी रौंदळ, प्रमोद मुळाणे यांनी राजाभाऊ खेमनार यांच्या उमेदवारीला विरोध केला. त्यानंतर उमेदवारी केलेल्या खेमनार यांना पाडण्यासाठी जंग-जंग पछाडले. मात्र, खेमनार तब्बल ११७ मतांच्या फरकाने दणणीत विजयी झाले. त्यामुळे जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या एनटी गटातून खेमनार हे जॉइंट किलर ठरले.

Winning candidates cheering after the counting of votes in District Labor Federation elections
Labor Federation Election : भोसलेंना धक्का; सकाळे-आहेर-खेमनार यांची सरशी!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com