
-सतिश निकुंभ
सातपूर : ‘महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळा’च्या (बीओसीडब्ल्यू) तीन वर्षांतील ७ हजार कोटी रुपयांच्या खर्चाचे सामाजिक सर्वेक्षण (सोशल ऑडिट) दीर्घ प्रतीक्षेनंतर होणार आहे. कामगारांना काही हजारांच्या वस्तू देत कल्याणाच्या नावाखाली त्यांची बोळवण करणाऱ्या या वादग्रस्त मंडळाची सामाजिक झाडाझडती करण्यासाठी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर एका अननुभवी संस्थेकडे काम सोपविण्याचा आदेश काढण्यात आला होता. यावर माध्यमांनी आवाज उठवल्या नंतर हे काम आत राज्य शासनाच्या संस्थेला देण्यात आले आहे. यामधे भोजनावळीच्या माध्यमातून उखड पाडंरे करणार्यासह इतर बाबी उजेडात येतील आशी आपेक्षा संघटनानी व्यक्त केली आहे.