Nashik : विमानसेवेसाठी राजकीय पाठबळाची कमतरता

nashik ozar airport
nashik ozar airportesakal

नाशिक : ओझर विमानतळावरून (Ozar Airport) राष्ट्रीय (National) व आंतरराष्ट्रीय (International) सेवा सुरू करायची असेल, तर त्यासाठी राजकीय पाठबळाची आवश्‍यकता आहे. इन्फ्रास्ट्रक्चर तयार आहे. फक्त केंद्र सरकारच्या नागरी हवाई मंत्रालयाबरोबरच (Ministry of Civil Aviation) संरक्षण मंत्रालयाच्या परवानगी गरज आहे. परंतु, राजकीय पाठबळ कमी पडत असल्याने निरंतर सेवा सुरू होत नाही. (Lack of political support for airlines Ozar airport Nashik News)

हवाईसेवा सुरू झाल्यास उत्तर महाराष्ट्राच्या विकासाला चालना मिळेल. विकास साध्य करायचा असल्यास आता नाशिकसह जळगाव, धुळे, नंदुरबार व नगर जिल्ह्यातील नागरिकांची चळवळ उभी राहीली पाहिजे असे मत व्यक्त केले जात आहे. ओझर विमानतळावर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विमानांचे उड्डाण करण्याची क्षमता आहे. या विमानतळावर पायाभूत सुविधा उपलब्ध आहे. देशातील दुसऱ्या क्रमांकाची धावपट्टी, मेन्टेनन्स, रिपेरिंग व ओव्हर ऑयलिंगची सुविधा, नाईट लॅण्डींगचा पर्याय, तसेच एक हजार प्रवासी क्षमतेचे टर्मिनल एवढ्या सुविधा असूनही ओझर विमानतळ सुरू होत नाही. येथून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू झाल्यास उत्तर महाराष्ट्राच्या विकासाला चालना मिळेल. परंतु, नियमित सेवा सुरू होत नसल्याने विकास रखडला आहे. आयटी, मेडिकल टुरिझम, पर्यटन यासारख्या उद्योगांमध्ये नाशिकला संधी असताना विमानसेवेमुळे ती मागे पडताना दिसत आहे. त्यामुळे आता विमानसेवा सुरू करण्यासाठी चळवळ उभी राहणे गरजेचे आहे.

"नाशिकच्या औद्योगिक विकासासाठी ओझर विमानतळावरून अधिकाधिक व नियमित उड्डाणांची आवश्‍यकता आहे. दररोज वीस उड्डाणे ओझर विमानतळावरून सुरू होवू शकतात. नियमित विमानसेवा सुरू झाल्यास नाशिकची औद्योगिक, शैक्षणिक व पर्यटन प्रगती खऱ्या अर्थाने होईल. ओझर विमानतळ फक्त नाशिक शहरापुरती मर्यादित नसून भौगोलिक दृष्ट्या पाहता संपूर्ण उत्तर महाराष्ट्रासाठी सोयीचे आहे. कल्याणपर्यंतचे रहिवासी व व्यापारी ओझरपर्यंत येतात. नाशिक व त्र्यंबकेश्वर, तसेच शिर्डी ही महत्त्वाची धार्मिक स्थळे असल्याने देशाच्या कानाकोपऱ्यातून येथे भाविक येत असल्याने त्यांच्यासाठी विमानसेवा अत्यंत गरजेची आहे. उडान योजनेंतर्गत यापूर्वी विमानसेवा सुरू झाली होती. त्या सेवेला चांगल्या प्रतिसाद मिळाला. दक्षिण व दक्षिण पूर्व आशिया देशात, तसेच आखाती देशांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्तर महाराष्ट्रातून प्रवासी जातात. त्यामुळे आंतरराष्ट्रीय सेवा सुरू झाल्यास त्या सेवेला चांगला प्रतिसाद मिळेल. विमान सेवा सुरू न होण्यामागे राजकीय पाठबळ कमी पडत असल्याचे दिसून येत आहे. राजकीय नेतृत्वाने नियमित विमान सेवेसाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे."

- उमेश वानखेडे, माजी अध्यक्ष, क्रेडाई, नाशिक, मेट्रो.

"उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, नगर व जळगावमध्ये विकासाच्या अनेक संधी आहे. परंतु, त्या संधीतील अडथळे दूर होणे गरजेचे आहे. राजकीय पाठबळ मिळाल्यास विकासातील अडथळे दूर झाल्याशिवाय राहणार नाही. ‘मी नाशिककर फोरम’च्या माध्यमातून नाशिकमध्ये विकासाची मोठी चळवळ उभी राहत आहे. नाशिकमध्ये मोठे उद्योग स्थापित करणे हा त्यामागचा उद्देश आहे. उद्योगांसाठी विमानसेवा गरजेची आहे. आयटी, मेडीकल, एज्युकेशन हब, फिल्म इंडस्ट्रीजमध्ये नाशिकला काम करण्याची चांगली संधी आहे. या संधीतून विकासाचा टप्पा गाठावा लागेल. विकासासाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे. विमानसेवेची मागणी करून उपयोग नाही. चळवळ उभी राहीली पाहिजे." - संजय कोठेकर, सीईओ, मी नाशिककर फोरम.

"उत्तर महाराष्ट्राच्या विकासाला चालना मिळण्यासाठी विमानसेवा अत्यंत गरजेची आहे. विमानसेवेला प्रतिसाद मिळतो, हे यापूर्वी स्पष्ट झाले आहे. त्यामुळे नाशिकमधून प्रवासी मिळत नाही, असा दावा खोडला गेला आहे. मुंबई, पुणे भागातील विकासाला मर्यादा आल्या आहेत. परंतु, नाशिकमध्ये त्यापेक्षा अधिक मोठी संधी आहे. समृद्धी महामार्ग, सुरत- चेन्नई ग्रीन फिल्ड कॉरिडॉर, पुणे- नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे, नाशिक - मुंबई महामार्गाचे भविष्यातील आठपदरीकरण या सेवांचा विचार केल्यास नाशिकच्या विकासाला उज्ज्वल भवितव्य असल्याचे दिसून येते. विकासाच्या या उज्ज्वल भविष्याचा विचार करता विमानसेवा अत्यंत गरजेची आहे."

- पियुष सोमाणी, संचालक, ईएसडीएस, नाशिक.

nashik ozar airport
नाशिक : विभागामध्ये खरीपाच्या 19 टक्के पेरण्या

"हैदराबाद, बंगलोर, चेन्नई, दिल्ली अशा आयटी डेस्टीनेशन्सशी नाशिक हवाई सेवेने जोडले गेल्यास तेथील आयटी उद्योगांचा विस्तार नाशिकमध्ये सहज होऊ शकेल. या महानगरांवर पडणारा अतिरिक्त ताणही कमी होऊ शकेल. धार्मिक पर्यटनासाठी शेकडो वर्षांपासून लोक नाशिकला येतात. एकट्या नाशिक जिल्ह्यातच ५६ वायनरी असून, वाइन कॅपिटल अशी नाशिकची नवी ओळख निर्माण झाली आहे. वाइन टुरिझमसाठी अथवा सुलाफेस्ट सारख्या इव्हेंटसला केवळ देशभरातूनच नव्हे तर विदेशातूनही नाशिकला लोक येत असतात. त्याचबरोबर आल्हाददायी वातावरणामुले वेलनेस टुरिझम, मेडिको टुरिझम आणि लिजर टूरिझमसाठी पर्यटकांचा मोठा ओघ नाशिककडे वळतो आहे. या सगळ्या बाबी लक्षात घेतल्या, तर नाशिकला सक्षम हवाईसेवा उपलब्ध होणे ही अपरिहार्यता आहे. खरे तर केवळ देशांतर्गतच नाही, तर आंतरराष्ट्रीय हवाई सेवाही नाशिकमध्ये उपलब्ध होऊ शकेल. त्यासाठी आवश्यक असलेली धावपट्टी, नाईट लॅण्डींग आदी सुविधा आधीपासूनच आपल्याकडे उपलब्ध आहेत."

- सुनील भायभंग, माजी अध्यक्ष, नाशिक सिटीझन्स फोरम.

nashik ozar airport
सिंहस्थ मार्गाच्या भूसंपादनासाठी 9 कोटींची मागणी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com